खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST2021-02-05T05:02:37+5:302021-02-05T05:02:37+5:30

पुणे : खरेदीच्या बहाण्याने चोरट्याने सराफी पेढीतून १ लाख ३० हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना येरवडा भागातील सराफी पेढीत घडली. ...

Under the pretext of shopping, jewelery lamps from Sarafi firm | खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने लंपास

खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने लंपास

पुणे : खरेदीच्या बहाण्याने चोरट्याने सराफी पेढीतून १ लाख ३० हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना येरवडा भागातील सराफी पेढीत घडली.

सराफ व्यावसायिक नथमल कावेडिया (वय ५३) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कावेडिया यांची येरवड्यातील काश्मिरी कॉलनी परिसरात अंबिका ज्वेलर्स ही सराफी पेढी आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास चोरटा दुकानात शिरला. त्याने दागिने खरेदीचा बहाणा केला. दोन ते तीन तोळे वजनाची सोनसाखळी खरेदी करायची आहे, अशी बतावणी चोरट्याने केली. त्यानंतर कावेडिया यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोनसाखळ्या दाखविण्यास सांगितले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने १ लाख ३० हजारांची सोनसाखळी लांबविली. चोरटा खरेदी न करता पेढीतून बाहेर पडला. काही वेळानंतर त्यांनी पाहणी केली. तेव्हा सोनसाखळी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

Web Title: Under the pretext of shopping, jewelery lamps from Sarafi firm