शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत नळजोडांनी पळविले पाणी

By admin | Updated: July 2, 2014 01:37 IST

शहरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असतानाच शहरात जेवढे अधिकृत नळजोड आहेत. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत.

पुणे : शहरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असतानाच शहरात जेवढे अधिकृत नळजोड आहेत. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत. विशेष म्हणजे या नळजोडांची माहिती असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती, अपुरे मनुष्यबळ आणि सुरक्षे अभावी या नळजोडांवर कारवाई करणे महापालिकेस शक्य झालेले नाही. या नळजोडांमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनीही घेतलेल्या अनधिकृत नळजोडांचा समावेश असून त्यातील काही लोकप्रनिधींचींच्या घरात तर तब्बल डझनभर नळ जोड आहेत. त्यामुळे एकीकडे पालिका पाणीबचतीचा नारा देण्यासाठी आपला घसा कोरडा करीत असली तरी, दुसरीकडे मात्र, या अनधिकृत नळजोडांमुळे लाखो लिटर पाण्याची चोरी होत आहे. शहरात सुमारे साडेसात लाख मिळकती आहेत. त्यातील सुमारे साडेपाच लाख रहिवासी मिळकती असून सव्वा लाख व्यावसायिक मिळकती आहेत. त्यातील सुमारे 1 लाख 20 हजार मिळकतींनाच नळजोड देण्यात आली असल्याची अधिकृत माहिती पालिका प्रशासनाकडे आहे तर तेवढेच अनधिकृत नळ शहरात असल्याची पालिकेची माहिती आहे. मात्र, या नळजोडांवर अद्याप कारवाई करण्याचे धाडस पालिका प्रशासनास झालेले नाही.(प्रतिनिधी)