शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मिलिटरी कॉलेजमध्ये पूल बांधणीच्या सरावादरम्यान दोन सैनिकांचा मृत्यू , ९ जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 19:39 IST

युद्धनीतीच्या सरावाचा भाग असलेल्या पूल बांधणीची सुरु होती कसरत

ठळक मुद्देपुल उभारणीचा सुरू होता सराव

पुणे : दापोडी येथील मिलीटरी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पुल बांधणीच्या सरावादरम्यान अचानक पुल कोसळल्यामुळे दोन जवानांचा मृत्यू झाला तर ९ जवान गंभीर जखमी झाले आहेत. यात एका लष्करी अधिका-ाचा समावेश आहे. ही घटना गुरूवारी दुपारी घडली. जखमींना खडकी येथील मिलीटरी हॉस्पिटल आणि पुण्यातील कमांड हॉस्पीटल येथे उपचारासाठी तातडीने हलवीण्यात आले आहे.
लान्स हवालदार पी. के. संजीवन, नायक बी. के. वाघमोडे अशी या अपघातात मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत. तर जखमींची नावे कळू शकली नाहीत. युद्धात आलेले नैसर्गीक आणि कृत्रिम अडथळे दुर करण्यासाठी पुण्यातील कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरिंग येथे अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. गुरुवारी  पुल उभारणीचे प्रात्यक्षिके महाविद्यालयात सुरू होती. बेली ब्रीज नामक पुल उभारणीचे काम सुरू असतांना पुलाचा आधार देणारा टॉवर अचानक हलल्यामुळे पूल खाली कोसळला. यावेळी पुलाखाली जवळपास १० ते १२ जवान होते. या पुलाच्या मलब्याखाली अडकलेल्या जवानांना बाहेर काढण्यासाठी तातडीने हालचाली करण्यात आला. लष्करी अधिकाऱ्यांनी पुलाचा राडारोडा बाजुला काढत खाली दबलेल्या जवानांना तातडीने बाहेर काढले.लान्स हवालदार पी. के. संजीवान, नायक बी. के. वाघमोडे या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ९ जवान गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने  खडकी येथील मिलीटरी हॉस्पीटल आणि पुण्यातील कमांड हॉस्पीटल येथे तातडीने दाखल करण्यात आले. त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू  आहे. यातील काही जनांची प्रकृती चिंताजनक आहे. 
मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना या अपघाता बाबत कळवीण्यात आले आहेत. ही घटना कशी घडली या बाबत चौकशी समिती (कोर्ट ऑफ इन्कॉयरी)  स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल आल्यावर या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती लष्कराच्या सुत्रांनी दिली.
...................
पुल उभारणीचा सुरू होता सराव
युद्धामध्ये शत्रुप्रदेशात अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम अडथळे येत असतात. एखादी छोटी दरी तसेच नदी ओलांडण्यासाठी लष्कराच्या इंजिनिअरींग विभागातर्फे कृत्रीम पुलाची उभारणी करण्यात येते. या पुलाच्या माध्यमातून अडथळे पार करून वेगाने शत्रुप्रदेशात आत जाता  येते. गुरूवारी कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरिंग येथे अशा प्रकारण्या पुल उभारणीचा सराव सुरू होता. बेली ब्रिज नामक पुल उभारण्यात येत असतांना या पुलाचा आधारस्तंभ अचानक कोसळल्यामुळे संपूर्ण पुल कोसळला. 

टॅग्स :dapodiदापोडीIndian Armyभारतीय जवानDeathमृत्यू