शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकरमध्ये दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन

By admin | Updated: August 18, 2015 03:48 IST

‘जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय’च्या घोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे दोन लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले

घोडेगाव : ‘जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय’च्या घोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे दोन लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. शनिवार व रविवार या दोन दिवस सुट्या व लागून आलेला पहिला श्रावणी सोमवार, असे तीन दिवस भीमाशंकरमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. इतरत्र कोठेही पाऊस नसला, तरी भीमाशंकरमध्ये अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या व सगळा परिसर धुक्याने वेढलेला होता. अशा वातावरणात भाविक दर्शनरांगेत उभे राहून दर्शन घेत होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ७० पोलीस कर्मचारी व १० अधिकारी तैनात करण्यात आले होते. शनिवारी व रविवारी असा दोन दिवस पोलीस बंदोबस्त कमी असल्यामुळे घोडेगाव व राजगुरुनगरच्या मोजक्या पोलिसांवर ताण आला होता. आळंदी येथील स्वकाम सेवा मंडळाचे स्वयंसेवक मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे काम करीत होते. आरोग्य विभागानेही फिरते आरोग्य पथक नेमले होते. देवस्थानाचे कार्यकारी विश्वस्त व खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे, आंबेगावचे तहसीलदार बी. जी. गोरे, उपकार्यकारी विश्वस्त सुरेश कौदरे, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोषकुमार गिरीगोसावी, घोडेगावचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर हे थांबून यात्रेचे नियोजन करीत होते. (वार्ताहर)