सासवडला झालेल्या घरफोडीतून 'अडीच लाखांचा' मुद्देमाल लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 16:35 IST2021-10-20T16:34:21+5:302021-10-20T16:35:21+5:30
सासवड येथील उत्तम ढाब्यामागील कमळ कॅस्टेल सोसायटी मधील शुभांगी दत्तात्रय गाडेकर यांच्या फ्लॅट मधून १६ ऑकटोबर ते १९ ऑकटोबर दरम्यान चोरट्याने फ्लॅट मधील दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

सासवडला झालेल्या घरफोडीतून 'अडीच लाखांचा' मुद्देमाल लंपास
सासवड : सासवड शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सासवड येथील उत्तम ढाब्यामागील कमळ कॅस्टेल सोसायटी मधील शुभांगी दत्तात्रय गाडेकर यांच्या फ्लॅट मधून १६ ऑकटोबर ते १९ ऑकटोबर दरम्यान चोरट्याने फ्लॅट मधील दागिने व रोख रक्कम चोरून नेली. त्यामध्ये १४ हजार रुपये किंमतीचे साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र ४ हजार रुपये किंमतीचे कानातले १२ हजार रुपये किमतीची अंगठी ,५० हजार रुपये रोख असे मिळून अडीच लाख लंपास केले आहेत.
सासवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल असून पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लोणकर तपास करीत आहेत. याच भागातील वैष्णव लक्ष्मी हाईट मधून शशांक शिरीष नवले यांनी त्यांची स्पेंडर मोटर सायकल दिनांक १८ ऑकटोबर ते १९ ऑकटोबर दरम्यान चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे.
तहसील कार्यालयातूनच चंदनाची चोरी
सासवड तहसील कार्यालयाचे आवारातून चंदनाचे झाडाचे बुंधा चोरीला गेल्याची तक्रार अवधूत गोविंद खैरे यांनी सासवड पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे. पुरंदर तहसील कार्यालयाचे पाठीमागील बाजूस सेतू सेवा केंद्र आहे. या इमारती चा मुख्य दरवाजा ची कडी तोडून चोरटयांनी चंदनाचे झाड तोडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या आवारातच पोलिसांची गार्ड रम देखील आहे. तहसील कार्यालयातूनच चंदनाची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे .