वनमंत्री गणेश नाईक यांची मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ; व्यक्त केली तीव्र नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 09:53 IST2026-01-15T09:53:14+5:302026-01-15T09:53:59+5:30
मतदान केंद्र शोधन्यासाठी नाईक कुटुंबाला अर्धा तास धावपळ करावी लागली.

वनमंत्री गणेश नाईक यांची मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ; व्यक्त केली तीव्र नाराजी
नवी मुंबई: मतदान केंद्राविषयी योग्य माहिती न मिळाल्याचा फटका सामान्य नागरिकांसह वनमंत्री गणेश नाईक यांनाही बसला. नाव न सापडल्याने दोन केंद्रांवर धावपळ करावी लागली.
नवी मुंबईत सर्व निवडणुकांमध्ये गणेश नाईक सहपरीवार मतदान करत असतात. कोपरखैरणे शाळा क्रमांक ९४ मध्ये मतदान असायचे. यावेळेस त्यांचे नाव सेंट मेरी शाळेत असल्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबातील काहींचे मतदान शाळा क्रमांक ९४ व काहींचे सेंट मेरीमध्ये आले आहे. मतदान केंद्र शोधन्यासाठी नाईक कुटुंबाला अर्धा तास धावपळ करावी लागली.
मतदान केंद्रावरील गोंधळाविषयी गणेश नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्री, आमदार कुटुंबातील सदस्यांच्या नावात घोळ असेल तर इतरांचे काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. याची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.