Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 21:25 IST2026-01-15T07:08:25+5:302026-01-15T21:25:42+5:30
Maharashtra BMC TMC PMC Exit Poll Result 2026 Live Updates in Marathi: राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान आज पार पडले आहे. उद्या म्हणजे १६ ...

Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
Maharashtra BMC TMC PMC Exit Poll Result 2026 Live Updates in Marathi: राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान आज पार पडले आहे. उद्या म्हणजे १६ जानेवारी महापालिकांचे निकाल जाहीर होणार आहे. कोणत्या महापालिकेत कोणाची सत्ता येणार, याबद्दलची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. मुंबई महापालिका कोणाची उद्धव व राज या ठाकरे बंधूंची की भाजप व शिंदेसेनेची तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका भाजपची की अजित पवार-शरद पवार या जोडीची याचा फैसला मतदार करणार आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये कोणाची सत्ता येणार, याबद्दलचे संकेत मिळणार आहेत. पाहा, या सर्व महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानाचे आणि एक्झिट पोलचे Live Updates...
LIVE
15 Jan, 26 : 11:34 PM
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत गुरुवारी (दि. १५) सरासरी ५८ टक्के मतदान झाले. महापालिका निवडणुकीत ३२ प्रभागांतील १२८ जागांपैकी दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित १२६ जागांसाठी एकूण ६९२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात (ईव्हीएम) बंद झाले. आज (शुक्रवारी) आठ केंद्रांवर मतमोजणी होणार आहे.
महापालिका क्षेत्रात एकूण १७ लाख १३ हजार ८९१ मतदार असून त्यात ९ लाख ५ हजार ७२८ पुरुष, ८ लाख ७ हजार ९६६ महिला व १९७ इतर मतदारांचा समावेश आहे. एकूण २,०६७ केंद्रांवर मतदान झाले. सकाळच्या टप्प्यात मतदारांचा प्रतिसाद कमी होता. मात्र, सकाळी नऊनंतर मतदानाचा टक्का हळूहळू वाढत गेला. काही ठिकाणी तांत्रिक अडथळे आणि प्रशासकीय गोंधळाचे प्रसंग घडले असले तरी संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.
15 Jan, 26 : 11:24 PM
पनवेल महानगपालिका सार्वत्रिक निवडणूक; 6 ठिकाणी होणार मतमोजणी
पनवेल महानगरपालिकेसाठी झालेल्या मतदानानंतर आता शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरूवात होणार आहे. एकूण 6 ठिकाणी एकाच वेळेस मतमोजणीला सुरुवात होईल. यासाठी निवडणूक अधिकारी तथा पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आवश्यकतेनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला असल्याची माहिती पालिकेचे निवडणूक विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिली.
15 Jan, 26 : 10:34 PM
जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ?
महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आज राज्यभरात मतदान पार पडले. उद्या निकाल हाती येणार आहेत. याआधी आज एक्झिट पोलचे आकडे समोर आले. सांगली महानगरपालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, यामुळे या महानगरपालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या ७८ जागांसाठी ३८१ उमेदवार रिंगणाक आहेत.
या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), जनसुराज्य, शिंदेसेना स्वबळावर लढत आहेत. तर काँग्रेस -राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने आघाडी केली होती. एक्झिट पोलनुसार भाजपने सरशी घेतल्याचे दिसत आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलच्या अंदाडानुसार, ३८ जागा भाजपाला मिळण्याचा अंदाज दिला आहे. दुसऱ्या नंबरवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० जागा मिळण्याची शक्यता आहे.
15 Jan, 26 : 10:00 PM
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
नाशिक महानगर पालिकेसाठी आज मतदान पार पडले. आता सर्वांच्या नजरा या उद्या येणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. या आधी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. नाशिकमध्ये शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष असणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
साम टीव्हीचा एक्झिट पोलनुसार शिंदेसेनेला ५५ तर भाजपला ५२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला ५, ठाकरेसेनेला ५, शरद पवार राष्ट्रवादीला १, मनसेला २ आणि इतरांना १ जागा मिळू शकतात.
15 Jan, 26 : 09:29 PM
बेजबाबदार निवडणूक आयुक्तांमुळे नागपुरात मतदार यादीचा घोळ
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणूकीत झालेल्या कमी मतदानामुळे राजकारण तापू लागले आहे. पुर्व नागपुरातील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी थेट निवडणूक आयुक्तांवरच टीका केली आहे. बेजबाबदार आयुक्तांमुळेच मतदार यादीचा घोळ झाला असून इतके कमी मतदान होणे ही लाजीरवाणी बाब असल्याची टीका खोपडे यांनी केली आहे.
15 Jan, 26 : 08:45 PM
खुद्द गडकरींच्या घरातच मतदार यादीचा घोळ
निवडणूक आयोगाच्या तांत्रिक नियोजनाचा फटका सर्वसामान्यांप्रमाणेच आता बड्या नेत्यांनाही बसू लागला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबाला आज मतदार यादीतील गोंधळाचा थेट अनुभव आला. कुटुंबातील ६ सदस्यांची नावे एकाच ठिकाणी असण्याऐवजी ती दोन वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर विभागली गेल्याने गडकरींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
15 Jan, 26 : 08:12 PM
BMC Election Exit Poll Result Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, उद्धवसेना-मनसे-राष्ट्रवादी (शरद पवार) यांना एकत्र येऊन धक्का बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एक्झिट पोलच्या निष्कर्षानुसार, मुंबई महापालिकेमध्ये भाजपा-शिंदेसेना युतीला १३१ ते १५१ जागा मिळू शकतात. उद्धवसेना-मनसे यांना ५८ ते ६८ जागा मिळू शकतात, असा अंदाज मांडला गेला आहे.
'साम'च्या एक्झिट पोलनुसार, भाजपाचे ८४ नगरसेवक जिंकून येऊ शकतात. शिंदेसेनेला ३५ जागांवर विजय मिळू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ३ जागांवर विजयी होईल, असा अंदाज आहे.
उद्धवसेनेला ६५ जागांवर यश मिळू शकते, तर मनसेचे १० नगरसेवक विजयी होतील, असा अंदाज आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे २० उमेदवार जिंकून येतील, असा अंदाज या एक्झिट पोलने मांडला आहे.
15 Jan, 26 : 07:56 PM
पुणे महापालिकेत भाजपाचीच सत्ता, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळण्याचा अंदाज?
सामच्या एक्झिट पोलने पुणे महापालिका निवडणुकीबद्दल अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या एक्झिट पोलनुसार पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा ७० जागा जिंकेल, शिंदेसेना १२ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ५५ जागा, काँग्रेसला ८ जागा, उद्धवसेना ५ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १० जागा, मनसेला २ जागा मिळतील, असा अंदाज आहे.
15 Jan, 26 : 07:26 PM
भाजप-शिंदेसेनेत राडा; पोलिसांचा लाठीमार आणि 'हाय व्होल्टेज' ड्रामा
उल्हासनगर महापालिका निवडणूक मतदानादरम्यान शहरात ठिकठिकाणी हिंसाचार आणि वादाच्या घटना घडल्या आहेत. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या मतदानाला दुपारी गालबोट लागले. भाजप आणि शिंदेगट कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षाने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अनेक ठिकाणी सौम्य लाठीमार करावा लागला आहे.
15 Jan, 26 : 07:19 PM
Thane municipal Election Exit Poll 2026: ठाण्यात शिंदेसेनेची सरशी होणार, उद्धवसेना-मनसेचे काय?
'साम'च्या एक्झिट पोलमध्ये ठाणे महापालिकेमध्ये भाजपाला २६ जागा, तर शिंदेसेनेला ७२ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला १० जागा, तर काँग्रेसला ३ जागा, उद्धवसेनेला ३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १५ जागा, मनसेला २ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
15 Jan, 26 : 06:27 PM
Municipal Election Exit Poll: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर
महापालिका निवडणुकीचे कल समोर येण्यास सुरूवात झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचा 'साम'चा एक्झिट पोल समोर आला असून, त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता येण्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असेल. शिंदेसेनेला ५, तर उद्धवसेनेला २ जागा मिळतील, असा कौल या एक्झिट पोलने दिला आहे.
15 Jan, 26 : 05:59 PM
BMC Election Exit Poll 2026 Result: महापालिकेची सत्ता कोणाच्या हातात जाणार?
राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान आज पार पडले आहे. उद्या म्हणजे १६ जानेवारी महापालिकांचे निकाल जाहीर होणार आहे. कोणत्या महापालिकेत कोणाची सत्ता येणार, याबद्दलची उत्सुकता सगळ्यांनाच असून, एक्झिट पोलचे अंदाजही थोड्याच वेळात समोर येणार आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये कोणाची सत्ता येणार, याबद्दलचे संकेत मिळणार आहेत.
15 Jan, 26 : 05:45 PM
BMC Election 2026: साडेपाच नंतर आलेले काही मतदार मतदान न करता परतल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.
15 Jan, 26 : 05:45 PM
शहर पोलीस आयुक्त राकेश ओला हे नागपुरी गीत परिसरातील मतदान केंद्रावर
अमरावती : मतदानाची वेळ संपताच शहर पोलीस आयुक्त राकेश ओला हे नागपुरी गीत परिसरातील मतदान केंद्रावर पोहोचले रस्त्यावर असलेल्या व ज्यांचे मतदान झालेले आहेत त्यांना बाहेर जाण्याची त्यांनी विनंती केली
15 Jan, 26 : 05:22 PM
BMC Election 2026: भांडुप विधानसभा प्रभाग 109 मध्ये निवडणूक आयोगाचा कारभाराविरुद्ध राष्ट्रवादी महिला नेत्या मनिषा तुपे यांनी नाराजी वर्तवत जाब विचारला
15 Jan, 26 : 05:17 PM
सांगली महापालिकेसाठी साडेतीनपर्यंत ४२ टक्के मतदान
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४१.७९ टक्के मतदान झाले. सांगलीतील प्रभाग ११, १२ व १३ तर कुपवाडमधील प्रभाग १ मध्ये सर्वाधिक मतदान झाले. आतापर्यंत ९६ हजार ३४४ पुरूष व ९३ हजार ५५३ महिला मतदारांनी हक्क बजावला आहे. प्रभाग क्रमांक नऊमधील सह्याद्रीनगर केंद्रावर बोगस मतदान झाल्याचे आढळून आले. तर मिरजेतील जवाहर हायस्कूल येथे बुथवर ईव्हीएम बंद पडल्याने मतदार ताटकळत होते. मतदान सुरू होण्यास एक तास विलंब लागला झाला होता. प्रभाग १० मधील सर्वोदय हायस्कूल येथील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही प्रभागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
15 Jan, 26 : 05:01 PM
कोल्हापुरातील नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार, साडेचार वाजेपर्यंत ५० टक्के मतदान
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी कोल्हापुरात गुरुवारी दुपारी साडेचार वाजेपर्यंत ५०.८५ टक्के मतदान झाले. महानगरपालिका निवडणुकीसाठी, खासदार श्री शाहू छत्रपती यांनी नवीन राजवाडा शेजारील असलेल्या न्यू पॅलेस मराठी शाळा मतदान केंद्रात, जाऊन मतदानाचा अधिकार बजावला. आमदार सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर, आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्यान कार्यालयात, खासदार धनंजय महाडिक यांनी सपत्नीक रुईकर कॉलनी येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
15 Jan, 26 : 05:01 PM
Ulhasnagar Municipal Election 2026
Ulhasnagar Municipal Election 2026: उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३४.८८% मतदान झाले
15 Jan, 26 : 04:50 PM
महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची मतदानासाठी धावाधाव, पण...
महिला गुप्तहेर रजनी पंडित या मतदान करण्यासाठी माटुंगा येथे गेल्या मात्र तेथे त्यांचे मतदान यादीत नाव नसल्याने त्यांना यशवंत नाट्यमंदिराजवळ असलेल्या मुंबई पब्लिक स्कुलमध्ये पाठवले, मात्र तेथे ही नाव नाही.आता त्या सध्या माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिराजवळ असलेल्या मुंबई पब्लिक स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला गेले असता मतदान यादीत नाव नाही.
15 Jan, 26 : 04:50 PM
Nashik Municipal Election 2026:
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगपालिका निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.०९ टक्के मतदान
15 Jan, 26 : 04:46 PM
Panvel Municipal Election 2026
Panvel Municipal Election 2026: पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी ४ वाजेपर्यंत ४४ टक्के मतदान
15 Jan, 26 : 04:45 PM
Jalgaon Municipal Election 2026
Jalgaon Municipal Election 2026: जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३४.२७ टक्के मतदान
15 Jan, 26 : 04:43 PM
Navi Mumbai Municipal Election 2026
Navi Mumbai Municipal Election 2026: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४५.४८ टक्के मतदान झाले
15 Jan, 26 : 04:42 PM
Akola Municipal Election 2026 : अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४३.३५ टक्के मतदान
15 Jan, 26 : 04:42 PM
BMC Election 2026
BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.०८ टक्के मतदान
15 Jan, 26 : 04:42 PM
Dhule Municipal Election 2026 : धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३६.३९ टक्के मतदान
15 Jan, 26 : 04:41 PM
Solapur Municipal Election 2026 : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४०.३९ टक्के मतदान
15 Jan, 26 : 04:40 PM
Amravati Municipal Election 2026 : अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४०.६२ टक्के मतदान
15 Jan, 26 : 04:38 PM
दोंदे दाम्पत्याने अमेरिकेतून येऊन परळ मध्ये बजावला मतदानाचा हक्क
मुंबईतील भोईवाडा, परळ प्रभाग क्रमांक २०१ या मतदार संघात ऋत्विक दोंदे आणि पत्नी अमृता दोंदे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत मतदान करण्याचा आपला हक्क खास अमेरिकेतून येऊन बजावला. 
15 Jan, 26 : 04:37 PM
अभिनेता शशांक केतकर याची फेसबुक पोस्ट
ज्या शाळेत मतदान केले त्या शाळेच्या अगदी बाहेर ही अवस्था आहे . उद्या कोणत्याही पार्टीतला कोणीही निवडून आला तरी ‘ स्वच्छता ‘ या basic गोष्टीसाठी कोणीही पुढाकार घेणार नाही आणि नागरीक सुद्धा स्वच्छतेकडे लक्ष देणार नाहीत याची खात्री आहे
15 Jan, 26 : 04:35 PM
भांडुपच्या राजाराम शेठ विद्यालयाबाहेर माकडांनी मतदान केंद्रावरच लावली हजेरी
एकीकडे मतदार यादीत नाव सापडत नव्हतं, तर दुसरीकडे भांडुपच्या राजाराम शेठ विद्यालयाबाहेर माकडांनी मतदान केंद्रावरच हजेरी लावली होती. राजकीय नेते मंडळींपेक्षा जास्त लक्ष आज कर्मचारी वर्गाचं माकडांकडे होते. कारण उमेदवारांपेक्षा ही मर्कट मंडळीच मतदार यादी उचलून नेतील की काय, अशीच परिस्थिती या केंद्रात पहावयास मिळाली.
15 Jan, 26 : 04:33 PM
नवी मुंबईतील शिरवणेतील मतदान केंद्रामध्ये कोब्रा
नवी मुंबई : शिरवणे प्रभाग २१ मधील मतदान केंद्रामध्ये दुपारी कोब्रा आढळला. यामुळे मतदारांमध्येही खळबळ उडाली होती. सापाला सुरक्षीतपणे पकडून बाहेर सोडण्यात आले.शिरवणे येथील लक्ष्मीबाई सुतार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. दुपारी केंद्रामध्ये अचानक कोब्रा सापाचे दर्शन झाले.
15 Jan, 26 : 04:30 PM
Chandrapur Municipal Election 2026: चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : २६.२६
15 Jan, 26 : 04:21 PM
Dhule Municipal Election 2026 : धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये राडा, ईव्हीएमची तोडफोड!
धुळे : धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना आज दुपारी प्रभाग १८ मध्ये खळबळजनक घटना घडली. मिरच्या मारोती शाळेतील मतदान केंद्रावर दोन गटात जोरदार वाद झाला, ज्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख व उमेदवार सतीष महाले आणि विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये दुपारी १२:३० च्या सुमारास बाचाबाची झाली. या वादादरम्यान एका जमावाने थेट मतदान केंद्रात शिरून एका ईव्हीएम (EVM) मशिनची तोडफोड केली. घटनास्थळी एक हाताचे घड्याळही सापडले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सतीष महाले यांनी केली आहे.
15 Jan, 26 : 04:15 PM
Nagpur Municipal Election 2026 : नागपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६; दुपारी १.३० वाजेपर्यंत २६.५०% मतदान
15 Jan, 26 : 04:14 PM
NMMC Election 2026 : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 - 26 : 1.30 वाजेपर्यंत पर्यंत 33.26% मतदान
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 - 26
मतदान दिनांक 15 जानेवारी 2026
सकाळी 7.30 ते 1.30 वा.
मतदान तपशील
बेलापूर - 29.36 %
नेरूळ - 33.20 %
वाशी - 34.87 %
तुर्भे - 35.68 %
कोपरखैरणे - 30.96 %
घणसोली - 34.10 %
ऐरोली - 33.43 %
दिघा - 35.45 %
---------------------
एकूण - 33.26 %
15 Jan, 26 : 04:12 PM
BNMC Election 2026 : भिवंडीतील प्रभाग १५ मधील बूथ १७ मधील इव्हीएम मशीन दोन तास बंद
भिवंडी: शहरातील नवी वस्ती येथील प्रभाग क्रमांक १५ येथील मराठी शाळेत असलेल्या बूथ क्रमांक १७ मधील ईव्हीएम मशीन दोन तास बंद झाली होती.ईव्हीएम मशीन बंद झाल्याने या ठिकाणी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.बूथ अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन बदलल्या नंतर दोन तासांनी मतदान सुरळीत झाले मात्र तोपर्यंत या बूथवर मोठी गर्दी जमली होती.अनेक महिला व मतदार मातदानासाठी ताटकळत बसले होते.
15 Jan, 26 : 04:04 PM
Ahilyanagar Municipal Election 2026 : अहिल्यानगरमध्ये मतदानासाठी बोगस कार्ड; काही उमेदवारांनी ताब्यात घेतली कार्ड
अहिल्यानगर: अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये काही मतदारांची बोगस मतदान कार्ड तयार करण्यात आली. या कार्डचा वापर करून मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान घडवून आणले जात असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या उमेदवारांनी केला आहे.
15 Jan, 26 : 04:00 PM
Akola Municipal Election 2026 : नागरिकच आता नेत्यांना धडा शिकवत आहेत : ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोला : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी अकोला येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भूमिका मांडली.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आजचा मतदार अधिक जागरूक झाला आहे. नागरिकच आता नेत्यांना सुधारत असून, आवश्यकतेनुसार त्यांना धडाही शिकवत आहेत.” लोकशाही व्यवस्थेत मतदारांची भूमिका अधिक प्रभावी होत चालल्याचे त्यांनी नमूद केले.
15 Jan, 26 : 03:55 PM
Pune Municipal Election 2026 : सकाळी कोणीतरी महिला आली अन् मतदान करून गेली; पुण्यात महिलेच्या नावावर आधीच झाले मतदान
#pmcelection2026#Election : सकाळी कोणीतरी महिला आली अन् मतदान करून गेली; पुण्यात महिलेच्या नावावर आधीच झालेले मतदान #pune#Maharashtra#votingpic.twitter.com/XrsGhWew0o
— Lokmat (@lokmat) January 15, 2026
15 Jan, 26 : 03:42 PM
Thane Municipal Election 2026 : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सायंकाळपर्यंत ६० टक्क्यांहून अधिक मतदानाचा अंदाज - प्रताप सरनाईक
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत ठाणेकरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ठाण्यातील मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात स्वतःला झोकून दिले असून सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत ६० टक्क्यांहून अधिक मतदान होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
15 Jan, 26 : 03:42 PM
Municipal Election 2026 : २०११ पासून केला जातो मार्कर पेनचा वापर, शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही - निवडणूक आयोग
मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०११ रोजी आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी; तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन-चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीदेखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
15 Jan, 26 : 03:40 PM
Kolhapur Municipal Election 2026 : कोल्हापुरात १.३० वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान
15 Jan, 26 : 03:39 PM
Akola Municipal Election 2026 : अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26; 1.30 वाजेपर्यंत 30.45% मतदान.
15 Jan, 26 : 03:34 PM
BNMC Election 2026 : भिवंडीत भाजप कार्यकर्त्यांकडून कोणार्क विकास आघाडीच्या समर्थकांना मारहाण...
भिवंडी: शहरात मनपा निवडणुकीसाठी मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असून काही ठिकाणी शांततेत तर काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरणात मतदान सुरु आहे. प्रभाग क्रमांक एक येथे भाजपा आमदार महेश चौघुले आणि कोणार्क आघाडीचे उमेदवार माजी महापौर विलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन चौघुले कार्यकर्त्यांनी कोणार्क विकास आघाडी समर्थकांना मारहाण केली आहे.सकाळपासूनच या दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची सुरु झाली होती
15 Jan, 26 : 03:23 PM
Thane Municipal Election 2026 : लोकशाहीची अंतिम घटका मोजली जात आहे; जितेंद्र आव्हाड यांचा निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक प्रक्रिया आणि प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मतदान केंद्रांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असून, यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. आव्हाड म्हणाले, “महाराष्ट्रात लोकशाहीची अंतिम घटका मोजायला सुरुवात झाली आहे. संविधानानुसार मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणतेही बॅनर, प्रचार साहित्य असू नये. मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रांच्या आतच बॅनर लावले जात आहेत. पत्रकारांना ‘आम्ही परवानगी दिली आहे’ असे सांगितले जात आहे. वृषाली पाटील नावाच्या अधिकाऱ्यांनी जर आतमध्ये बॅनर लावण्यास परवानगी दिली असेल, तर हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे,” असा आरोप त्यांनी केला.
15 Jan, 26 : 03:16 PM
Nashik Municipal Election 2026 : पैसे वाटपावरून नाशिकच्या सिडकोत तणाव, पोेलीसांचा सौम्य लाठीमार
नाशिक : सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ आणि २९ मध्ये पैसे वाटप होत असल्याच्या कारणाने आज दुपारी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या सावतानगर येथील कार्यालयामागे असलेल्या उद्यानात पैसे वाटप होत असल्याची चर्चा सुरू झाल्याने पैसे घेण्यासाठी प्रचंड मोठी रांग लागली होती. जवळपास सहा ते सात हजार महिला व पुरुष येथे जमले होते. ही माहिती मिळताच शिंदे सेनेचे उमेदवार ॲड.अतुल सानप व अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आपल्या कार्यकर्त्यांसह बडगुजर यांच्या कार्यालयावर आल्याने दोन्ही तिन्ही गट समोरासमोर आले.
15 Jan, 26 : 03:12 PM
Nashik Municipal Election 2026 : सकाळच्या ४ तासांमध्ये नाशिकला केवळ १६ टक्के मतदान
नाशिक : मतदारांना स्लीपचे न झालेले वाटप, मतदारांच्या यादीमधील नावांतील गोंधळ, एकाच कुटुंबातील नावे विभिन्न केंद्रांवर, कुठे चार तर कुठे तीन उमेदवारांना मतदान असल्याने मतदारांचा उडालेला गोंधळ या सर्व प्रकारात नाशिकमध्ये गुरुवारी (दि. १५) मतदानाच्या पहिल्या ४ तासांमध्ये अत्यल्प मतदान झाले. सकाळच्या दोन तासांमध्ये तर शहरात सरासरी ६.५१ टक्के इतकेच तर दुपारी ११:३० वाजेपर्यंतच्या चार तासांमध्ये एकूण मिळून सरासरी सुमारे १६.०७ टक्केच मतदानाची नोंद झाली आहे.
15 Jan, 26 : 02:43 PM
BMC Election 2026 : भांडुपमध्ये उद्धव सेनेच्या उमेदवार राजुल पाटील आणि शिंदे सेनेच्या उमेदवार सुप्रिया धुरत एकमेकांना भिडल्या
15 Jan, 26 : 02:36 PM
Dhule Municipal Election 2026 : धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये तणाव
धुळे: महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील प्रभाग १८ मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिरच्या मारोती शाळेतील मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठी खळबळ उडाली.
15 Jan, 26 : 02:35 PM
KDMC Election 2026 : धक्कादायक प्रकार! मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कोणीतरी करून गेलं
कल्याण पूर्व येथील गायत्री शाळेतील मतदान केंद्रात धक्कादायक प्रकार घडला आहे. मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कोणीतरी करून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. मतदार महिलेचे नाव सुमन भालचंद्र गायकवाड असे आहे.
15 Jan, 26 : 02:30 PM
BMC Election 2026 : मतदानाची खूण म्हणून बोटावर लावण्यात येत असलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल
15 Jan, 26 : 02:28 PM
Thane Municipal Election 2026 : ठाण्यात सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले; मतपत्रिकेत नावे नसल्याने विरोधकांचा आक्षेप
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील शिंदे सेनेचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी ठरले असून, त्यांच्या नावांचा मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या मतपत्रिकेत समावेश करण्यात आलेला नाही. या निर्णयावर विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असली, तरी निवडणूक यंत्रणेने नियमांनुसारच कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे.
15 Jan, 26 : 02:22 PM
Nashik Municipal Election 2026 : नाशिकरोड परिसरात मतदारांना पैसे वाटप करतांना एक ताब्यात
15 Jan, 26 : 02:16 PM
Akola Municipal Election 2026 : मतदान केंद्रावर तणाव, पोलिसांचा तात्काळ हस्तक्षेप
अकोला : अकोल्यातील भांडपुरा चौक येथील मतदान केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. वादाचे रूपांतर किरकोळ हाणामारीत होत असतानाच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मोठी गर्दी जमली होती, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. सध्या मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असून नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन आले आहे.
15 Jan, 26 : 01:59 PM
Jalgaon Municipal Election 2026 - जळगावात बोगस मतदान आणि घरासमोर बंदोबस्त लावण्यावरून तणाव
जळगाव महानगरपालिका प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ, अपक्ष उमेदवार पियूष पाटील यांच्याकडून शिंदेसेनेच्या उमेदवारावर आरोप. भाऊसाहेब राऊत विद्यालयात इव्हीएम मशिन एक तासापासून बंद आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये उध्वसेनेच्या उमेदवाराच्या घरासमोर बंदोबस्त लावण्यावरून काही काळ गोंधळ निर्माण झाला आहे.
15 Jan, 26 : 01:57 PM
Dhule Municipal Election 2026 : धुळे मनपा निवडणूक: तीन प्रभागांत ईव्हीएममध्ये बिघाड, तरीही मतदान शांततेत सुरू"
धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ११ वाजेपर्यंत शहरात सरासरी १० टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया सुरू असताना...
- प्रभाग क्रमांक १२: आनंदीबाई जावडेकर शाळा येथील मतदान केंद्रावरील मशिन बंद पडले.
- प्रभाग क्रमांक ६: पिंगळे येथील केंद्रावरही तांत्रिक बिघाड झाला.
- प्रभाग क्रमांक १५: येथील खोली क्रमांक १० मधील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने मतदान थांबवावे लागले.
प्रशासनाने तातडीने पावले उचलत नवीन ईव्हीएम बसवले. त्यानंतर या तिन्ही केंद्रांवर मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले.
15 Jan, 26 : 01:47 PM
भाजप सत्तेसाठी हपापलेले, विकास हाच आमचा मुद्दा – खासदार प्रणिती शिंदे
सोलापूर महानगरपालिका निवडणूक–२०२६ साठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) सोलापूर येथील मतदान केंद्र क्रमांक ०५ येथे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजप सत्तेसाठी हपापलेला असून कोणत्याही पातळीवर जाऊन ही निवडणूक लढवत आहे, हे लोकशाहीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि सोलापूरसाठी घातक आहे. नऊ वर्षांनंतर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होत असून, महाविकास आघाडी विकासाचा नवा दृष्टिकोन, नवी उमेद आणि नवी संकल्पना घेऊन जनतेसमोर गेली आहे.
15 Jan, 26 : 01:42 PM
NMMC Election 2026 : वनमंत्री गणेश नाईक यांच्याप्रमाणे सामान्य मतदारांचीही मतदान केंद्र शोधताना कसरत
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक : सर्व मतदारांना मतदान पत्रीका पोहचली नाही व संकेतस्थळावरही योग्य माहिती मिळत नसल्याचा फटका वनमंत्री गणेश नाईक यांच्याप्रमाणे घणसोली व इतर नागरिकांना ही बसला. घणसोली प्रभाग ८ मधील अनेक नागरिकांना त्यांचे यादीतील नाव व मतदान कुठे आहे हे न समजल्याने गोंधळ उडाला. अनेकांना मतदान पत्रीका भेटली नव्हती. यामुळे केंद्राबाहेरील मदतकक्षात अनेकांनी गर्दी केली होती.
15 Jan, 26 : 01:24 PM
Parbhani Municipal Election 2026 : परभणी मनपासाठी चार तासात ३०.५२ टक्के मतदान
परभणी : शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत चार तासामध्ये एकूण ३०.५२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये ७९ हजार ७२७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ४४ हजार १९० पुरुष मतदारांनी तर ३५ हजार ५३७ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
15 Jan, 26 : 01:02 PM
Nagpur Municipal Election 2026 : निवडणूक आयोगावर संशय घेणे अयोग्य - मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान केले यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर कुठल्याही प्रकारचा संशय घेणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मार्कर पेन संदर्भातील आरोप केले होते. त्यावर फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "सर्व गोष्टी निवडणूक आयोगाकडून ठरविण्यात येतात. यापूर्वीही अनेक वेळेला मार्कर पेन वापरला आहे. याबद्दल हरकत असेल तर आयोगाने याकडे लक्ष द्यावे. विरोधी पक्षांनी नवीन स्क्रिप्ट लिहिली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना झापले तरी पुन्हा पुन्हा तीच स्क्रिप्ट वापरतात. या निवडणुकीमध्ये आमचा विजय निश्चित आहे. आमचे विरोधी पक्ष उद्या काय कारण सांगायचे? याची प्रॅक्टिस करत आहे."
15 Jan, 26 : 11:57 AM
Akola Municipal Election 2026: यादीत नावच नाही! मतदान केंद्रावर गोंधळ
अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील मतदान केंद्रावर सकाळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदानासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मतदान यादीत अनेक मतदारांची नावे नसल्यामुळे मतदानाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत असून काही काळासाठी मतदान केंद्र परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मतदानाचा वेग मंद असल्याने रांगा अधिक वाढत असून प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
15 Jan, 26 : 11:57 AM
Navi Mumbai Municipal Election 2026: नवी मुंबई नेरूळ प्रभाग २५ मधील मतदान यंत्रात बिघाड
Navi Mumbai Municipal Election 2026: नवी मुंबई नेरूळ प्रभाग २५ मधील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदारांसह उमेदवारांनीही नाराजी व्यक्त केली. तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले.
15 Jan, 26 : 11:55 AM
Akola Municipal Election 2026: अकोला महापालिका मतदानासाठी शहरात सकाळपासून अल्प प्रतिसाद आहे. सकाळी ९.३० वाजतापर्यंत ६.४८ टक्के मतदान
15 Jan, 26 : 11:51 AM
Navi Mumbai Municipal Election 2026: निवडणूक आयोगाचा ढिसाळपणा पुन्हा एकदा दिसून आला
घणसोली येथील राजीव गांधी कॉलेजमधील मतदान केंद्रावर विकलांग मतदारांची गैरसोय झाल्याचे समोर आले. मतदान केंद्रात आत जाण्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध नसल्याने दिव्यांग मतदारांना खुर्चीत बसवून उचलून नेले जात असल्याची माहिती मिळाली. निवडणूक आयोगाने मागील एक महिन्यापासून कोणती सोय केली? काय तयारी केली? या संदर्भात आता साशंकता व्यक्त होत आहे.
15 Jan, 26 : 11:48 AM
BMC Election 2026 LIVE: उद्धव ठाकरे कुटुंबीयासह मतदानासाठी दाखल
15 Jan, 26 : 11:46 AM
Ulhasnagar Municipal Election 2026: उल्हासनगरात पहिल्या दोन तासात फक्त १.९८ टक्केच मतदान
उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सकाळी कॅम्प नं-५ सावित्रीबाई फुले शाळेतील मतदान केंद्रात ऐक ईव्हीएम मशीन बंद पडल्याने, नागरिकांना ऐक तास रांगेत तात्काळत उभे राहावे लागले. मतदार यादीतील त्रुटीमुळे नागरिकांना मनस्तापला सामोरे जावे लागले असून पहिल्या दोन तासात अवघे १.९८ टक्के मतदान झाले.
15 Jan, 26 : 11:43 AM
Jalgaon Municipal Election 2026: प्रभाग क्रमांक ५ अ मध्ये बोगस व दुबार मतदार येत असल्याचे आरोप
जळगाव शहरातील आर. आर. विद्यालय येथील मतदान केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपामुळे आज गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रभाग क्रमांक पाचमध्ये अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख, माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यात थेट लढत सुरू आहे. सकाळपासून संशयास्पद मतदार आल्याचा आरोप करत ॲड. पियुष पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
15 Jan, 26 : 11:39 AM
BMC Election 2026: “हे आम्ही खपवून घेणार नाही”; मतदान केल्यावर राज ठाकरेंचा इशारा
आजवर मतदानानंतर बोटाला लावली जाणारी शाई पुसता येत नव्हती. पण आता सॅनिटायझर लावले की शाई पुसली जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. संपूर्ण प्रशासन सध्या केवळ सत्तेसाठी मागे लागले आहे. हे जे काही सुरू आहे, त्याला लोकशाही म्हणता येणार नाही. आम्ही हे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा देत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मतदानादिवशी 'वॉच' ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
15 Jan, 26 : 11:35 AM
Nagpur Municipal Election 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रात पोहोचले
15 Jan, 26 : 11:33 AM
Jalgaon Municipal Election 2026: जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ९.३० पर्यंत ५.५ टक्के मतदान.
15 Jan, 26 : 11:30 AM
Navi Mumbai Municipal Election 2026: नवी मुंबईत पहिल्या दोन तासात ८.१८ टक्के मतदान; वाशी, दिघा सर्वात आघाडीवर: कोपरखैरणेत सर्वात कमी मतदान
15 Jan, 26 : 11:29 AM
Panvel Municipal Election 2026: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सकाळी ९.३० वाजेपर्यंत ८ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
15 Jan, 26 : 11:28 AM
Pune Municipal Election 2026: ८९ वर्षांच्या जागरूक नागरिक म्हणून पुणेकर आजींनी सकाळी मतदानाचा अधिकार बजावला
15 Jan, 26 : 11:26 AM
BMC Election 2026: मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नीलम गोऱ्हे...Live
15 Jan, 26 : 11:24 AM
Kalyan Dombivli Municipal Election 2026: कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू, सकाळी ७.३० ते ९.३० वाजता च्या दरम्यान ७.४७ टक्के मतदान
15 Jan, 26 : 11:22 AM
BMC Election 2026 LIVE: राज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, मतदानानंतर काय म्हणाले?
15 Jan, 26 : 11:21 AM
Thane Municipal Election 2026: पहिल्या दोन तासात अवघे ८ टक्केच मतदान
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांमध्ये सकाळच्या सत्रात उत्साह दिसून आला. मात्र मतदान यंत्रांमधील घोळ, ईव्हीएम मशीन बंद पडणे, एरर येणे या त्रुटीमुळे पहिल्या दोन तासात अवघे आठ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. काही ठिकाणी मशीन यंत्रणा बंद पडली, काही ठिकाणी एरर येत होते, तर काही ठिकाणी मशीनला शॉक लागण्याचा प्रकारही समोर आला. त्यामुळे सकाळच्या सत्रात खाजगी कंपनीत कामाला असलेले नोकरदार मतदानासाठी गेले खरे मात्र त्यांना एक ते दोन तास ताटकळत रांगेत उभे राहावे लागल्याने काहींनी मतदान न करताच घरी जाण्याचा मार्ग पत्करला. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीत दिसून आला. पहिल्या दोन तासात अवघ्या ८ टक्के मतदानाची नोंद झाली.
15 Jan, 26 : 11:18 AM
BMC Brihanmumbai Municipal Election 2026: उत्साहात मतदानाला आले , मात्र यादीत नाव नाही
मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी मतदारांनी ठिकठिकाणी सकाळपासूनच रांगा लावायला सुरुवात केली. अशाच उत्साही मतदाराना बोरिवलीच्या प्रभाग १७ मध्ये मात्र वाईट अनुभव आला. ध्रुव शाह आणि त्यांच्या कुटुंबातील तीन जणांचे नावच मतदार यादीत नसल्याचे समोर आले आहे. विधानसभेला याच प्रभागात मतदान केलेले असताना यावेळी मात्र मतदार यादीत नाव नाही असे कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ध्रुव शाह यांचे स्वतःचे, पत्नीचे आणि आई-वडिलांचे असे चौघांचे यादी नाव यादीत नसल्याचे समोर आले आहे.
संबंधित घोळासंबंधी पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता मतदार यादीत नाव नाही याचा अर्थ त्यांना मतदान करायचा अधिकार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. पालिकेकडून दोन महिन्यापूर्वी मतदार यादी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोणाचेही नाव अधिक करण्याचा किंवा डिलीट करण्याचा अधिकार प्रशासनाला नाही. त्यामुळे मतदारांची आपली नावे आवश्यक होते असे त्यांनी म्हटले.
इमारतीतील आणखी १५ जणांची नावे गायब - ध्रुव शाह राहत असलेल्या बोरिवलीतील कामधेनू इमारतीतील आणखी पंधरा जणांची नावे गायब असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभा आणि विधानसभेला मतदानाचा हक्क बजावूनही आपल्याला आता पालिका निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारला जात आहे यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे
15 Jan, 26 : 11:15 AM
Vasai Virar Municipal Election 2026: वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ९.३० पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी – ८.४९ टक्के
15 Jan, 26 : 11:11 AM
BMC Election 2026: भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले.
15 Jan, 26 : 11:10 AM
Navi Mumbai Municipal Election 2026: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० पर्यंत मतदान टक्केवारी: ८.१८ टक्के
15 Jan, 26 : 11:09 AM
Solapur Municipal Election 2026: सकाळी ९.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी: ६.८६ टक्के
15 Jan, 26 : 11:08 AM
Kolhapur Municipal Election 2026: काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला
15 Jan, 26 : 11:03 AM
Pune Municipal Election 2026: अभिनेता सुबोध भावेने बजावला मतदानाचा हक्क...Live
15 Jan, 26 : 11:00 AM
Vasai Virar Municipal Election 2026: तीन तास EVM मशीन बंद; मतदार केंद्रावर गोंधळ
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन तब्बल तीन तास बंद राहिल्याची घटना समोर आली आहे. सकाळपासूनच काही ठिकाणी मशीन अर्धा ते एक तास बंद असल्याचे निदर्शनास आले. प्रभाग क्रमांक २६, उमेळमान येथील जिल्हा परिषद शाळा, खोली क्रमांक ३, मतदान केंद्र २८ येथे मशीन तब्बल तीन तास बंद होती. यामुळे येथील उमेदवार आणि मतदारांमध्ये चांगला तणाव निर्माण झाला.
15 Jan, 26 : 10:55 AM
BMC Election 2026: भल्या पहाटे मतदान करण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आला वाईट अनुभव
महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून गुरुवारी पहाटेपासूनच आपल्या मतदारांना घराबाहेर काढत मतदान करण्यासाठीचे आवाहन केले जात असतानाच दुसरीकडे मात्र वडाळा येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक प्रकाश बोरगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वडाळा येथील मतदान केंद्रावर सकाळी सकाळीच वाईट अनुभव आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रकाश बोरगावकर आणि त्यांचे जेष्ठ सहकारी गुरुवारी भल्या पहाटे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी दाखल झाले. ज्या मतदान केंद्रावर बोरगावकर आणि सहकारी दाखल झाले, त्या केंद्रावरील यादीमध्ये नाव एकाचे आणि फोटो दुसऱ्याचा अशी स्थिती होती. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यादीमध्ये नाव मिळना झाले.
दरम्यानच्या काळात ॲपवर मात्र त्यांनी चेक केले असता तेथे मात्र व्यवस्थित माहिती मिळत होती. सकाळी किमान ४५ मिनिटं मतदार यादीमध्ये नाव शोधताना या सगळ्या जेष्ठ नागरिकांची तारांबळ उडाली. ४५ मिनिटं नाव शोधून देखील सापडत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप झाला. भल्या पहाटे मतदान करण्यासाठी आलो असताना देखील या पद्धतीने मनस्ताप होत असेल तर मतदान होणार कसे ?असे म्हणत बोरगावकर यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान याच काळामध्ये त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांची नावे दुसऱ्या मतदान केंद्रातल्या यादीवर आहेत आणि मतदान केंद्रात बदल झाला आहे, अशी माहिती देण्यात आली. त्यानुसार त्यांनी संबंधित केंद्रावर दाखल होत मतदान केले. मात्र ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रशासन केल्या कित्येक दिवसांपासून मतदानाची व्यवस्था चांगली आहे, असे सांगत होते त्याच प्रशासनाकडून भल्या पहाटे त्यांना वाईट अनुभव आल्याने मतदान केल्यानंतर संबंधितांनी नाराजी व्यक्त केली.
15 Jan, 26 : 10:54 AM
Nagpur Municipal Election 2026: सकाळी ९.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : ७ टक्के
15 Jan, 26 : 10:44 AM
मुंबईतील बांद्रामध्ये आशिष शेलारांचं मतदान, राज ठाकरेंवर केली टीका
15 Jan, 26 : 10:43 AM
यादीत नावच सापडेना, निवडणूक आयोगाला गणेश नाईकांनी असं सुनावलं
15 Jan, 26 : 10:43 AM
Sanjay Raut LIVE : पैसेवाटपासह लूट सुरू.. सत्ताधाऱ्यांवर संजय राऊतांनी ओढले शब्दांचे आसूड
15 Jan, 26 : 10:40 AM
कल्याण: अभिनेता निमिष कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क.
15 Jan, 26 : 10:40 AM
पुण्याचे बदललेले स्वरूप मुंबईपेक्षा भयंकर होत चालले आहे: अभिनेते सुबोध भावे
३ मजली इमारतीच्या जागी २७ मजली इमारती झाल्या म्हणून विकास नाही होत, नवीन कन्स्ट्रक्शन वाढलं यामुळे अनेक समस्या वाढल्या. विकास हा शहराचा गळा घोटून करायचा नसतो. मुलांना खेळायला ग्राउंड नाहीत जेष्ठ नागरिकांना फिरायला जागा नाहीत पेशवे वाघाने सारसबागाच्या नावावर किती दिवस उड्या मारणार, मिळेल त्या जागेत आता फक्त बिल्डिंग उभा केल्या जातात विकास हा माणसे जगण्यासाठी आणि जागवण्यासाठी असला पाहिजे. आता अपेक्षा केव्हाच संपलेत. मतदानापुरते नागरिकांनी मर्यादित न राहता नागरिक एकत्र आले तर दबाव गट बनवला तर काही होऊ शकेल. नागरिक विकासात नसतील तर विकास हा अंगावरच येणार आहे. फुकट द्यायचा असेल तर ग्राउंड द्या बाकी काही देऊ नका शहरातील प्रत्येक माणसाचा चांगलं जीवन जगण्याचा हक्क आहे नागरिकांचे जीवन सुसह्य करणं हे पहिलं काम आहे. बस फुकट देताय ,की मेट्रो फुकट देता यापेक्षा श्वास घ्यायला जागा देताय काही महत्त्वाचा आहे. मतदानाला लोक चांगली बाहेर पडलेत नागरिकांचा या सिस्टीम वरती असलेला विश्वास उडालेला नाही तो आहे लोकप्रतिनिधी सोबत आपल्यालाही काम करावे लागेल. मला अठरा वर्षे झाल्यानंतर मी एकही मतदानाचा हक्क बजावायचा सोडला नाही त्यामुळे मतदान करत रहा राष्ट्रीय हक्क आहे मूलभूत हक्क आहे तो बजावायलाच पाहिजे. आपल्याला दिलेले आश्वासन नगरसेवकांनी पूर्ण करण्याचा अधिकार नागरिकांचा आहे. नगरसेवकांनी घेतलेली निर्णय प्रत्येक योग्य ह्याच आपण म्हटले तर आपल्याला काहीही अधिकार नाही म्हणून मतदान करण्याचा. पुणे शहराचा अभिमान आहे. पुण्याचे बदललेले स्वरूप मुंबईपेक्षा भयंकर होत चाललेला आहे. नागरिकांचा दबाव राजकारणींवर नसेल तर लोकांविरुद्ध तक्रारी करून काही उपयोग नाही, नागरिकांचा दबाव घटना पुण्यात आहे ना राज्यात आहे. ज्या उमेदवारांना आपण निवडून देतो त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे उमेदवार काम करतात की नाही हे बघणं सुद्धा नागरिकांचे काम आहे. घटनेने मूलभूत अधिकार दिला आहे मतदान करण्याचा तो आपण पाळला पाहिजे आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे. आपलं कर्तव्य बजावून आपण बाहेर बसतो हे योग्य नाही, अशी सविस्तर प्रतिक्रिया अभिनेता सुबोध भावे यांनी मतदानावेळी दिली.
15 Jan, 26 : 10:33 AM
नाशिकमध्ये पहिल्या दोन तासात ८८ हजार ८५० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण ६. ५१ टक्के मतदान
15 Jan, 26 : 10:26 AM
पुणे : पहिल्या २ तासांत सरासरी 5.50 टक्के मतदान
15 Jan, 26 : 10:26 AM
मुंबईत मतदान केंद्रात शिरला होता घोणस जातीचा विषारी साप
मुंबई-चेंबूर येथे काल रात्री १० वाजता प्रभाग क्रमांक १४७ रात्री १० वाजता लॉरेटो कॉन्व्हेन्ट शाळा, आर सी एफ कॉलनी येथील मतदान केंद्रात ४ फूट लांबीचा घोणस जातीचा विषारी साप आढळला होता. त्यामुळे मतदान केंद्रातील सर्वअधिकारी, तसेच बंदोबस्ताला असलेल्या सुरक्षाकर्मी,पोलिसांमधे एकच खळबळ माजली.
मतदान केंद्र अधिकारी राजेश मते यांनी बीएलओ सुनील कदम यांचा मुलगा, सर्पमित्र अभिरूप कदम व मानव अभ्यास संघ व महाराष्ट्र ॲनिमल रेस्क्यू असोसिएशन च्या प्राणीमित्राणी ४ फुटाच्या विषारी घोणस जातीचा सापाला सुरक्षित पकडून, ठाणे वनविभागाच्या जनार्दन बोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित ठिकाणी त्याच्या अधिवासात सोडण्यात आले .
एम - पूर्व व पश्चिम विभागाच्या, निवडणूक निर्णय अधिकारी, डॉ. प्रियांका पाटील यांनी अभिरूप कदम यांचे आभार व्यक्त केले. त्याच्या कार्यतत्परते मुळे आजच्या पालिका निवडणुक मतदानाच्या दरम्यान घटणारी दुर्घटना टाळता आली.
15 Jan, 26 : 10:25 AM
कोल्हापूर: अनेक ठिकाणी यादी, बूथ घोळाने मतदारांची धावपळ
खोली क्रमांक चुकीचे पडल्याने अनेक केंद्रांवर गोंधळ उडाला. चार मते द्यायची असल्याने मतदानास वेळ लागत असून, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिक गोंधळलेले दिसत आहेत. लक्षतीर्थ वसाहतीतील एका मतदान केंद्रावर तीन मशीनवर कालची तारीख दिसत असल्याने मतदान सुरू होण्यास उशीर झाला. प्रभाग ९ मधील एकजुटी मंदिर येथील मतदान केंद्र क्रमांक २९ व ३० येथे सकाळी ७.३० वाजता मतदान सुरू झाले. मात्र, १०० मीटर नियम धाब्यावर बसवत मतदान केंद्रांसमोरच दुचाकी व चारचाकी वाहने उभी केल्याने तणाव निर्माण झाला. हरकत घेतल्यानंतर तैनात पोलिसांनी वाहने हटवली. या केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासूनच रांगा लागल्या होत्या. एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर विभागली गेल्याने मतदारांचा वेळ व ऊर्जा खर्ची पडत आहे. केंद्राबाहेर यादी तपासण्याची सोय नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांचीही धावपळ सुरू आहे. या सगळ्या गोंधळामुळे अनेक मतदारांमध्ये नाराजी व मनस्ताप व्यक्त होत आहे.
15 Jan, 26 : 10:25 AM
मतदानासाठी सकाळी ७ वाजल्यापासूनच रांगा, कोल्हापूरकरांचा दांडगा उत्साह
कोल्हापूर महानगरपालिकेच्या दहाव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी शहरातील ५९५ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० वाजता उत्साहात मतदानास सुरुवात झाली. २० प्रभागांतील ८१ जागांसाठी मतदान होत असून, अनेक ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. मात्र, मतदार यादीतील गोंधळ, बूथ क्रमांकांची चूक आणि माहितीअभावी अनेक मतदारांचा खोळंबा झाला. अनेक प्रभागांमध्ये उमेदवार व निवडणूक यंत्रणेकडून मतदार स्लिपचे वाटप न झाल्याने मतदारांना यादीत नाव शोधण्यासाठी बूथवर धावपळ करावी लागत आहे. हायटेक यंत्रणेद्वारे मतदार चिठ्ठ्या काढण्याची सुविधा असली, तरी त्याची माहिती नसल्याने अनेक मतदार संभ्रमात आहेत. काही मतदान केंद्रांवर ज्या बूथवर मतदान आहे, त्या यादीतच नाव नसल्याने नाराजी व्यक्त करत अनेक मतदार परत फिरताना दिसले. मतदारांची नावे घरापासून दूरच्या मतदान केंद्रांवर गेल्याने पायपीट वाढली आहे. मतदार ॲप संथ असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या. काही ठिकाणी बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचे, तर काही मतदारांच्या दोन्ही हातांच्या बोटांना शाई लावल्याचे प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. डाव्या हाताऐवजी उजव्या हाताला शाई लावल्याने काहींना दोनदा शाई लावावी लागली.
15 Jan, 26 : 10:24 AM
मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना भाजप युतीवर टीका
डोंबिवली: मनसे नेते राजू पाटील यांनी सहकुटुंब काटई मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मनसेचे उमेदवार योगेश पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितले, जो आपल्या भागात अन्याय झाला आहे. तो दूर करण्यासाठी सर्व भूमिपुत्रांनी मतदानासाठी उतरले पाहिजे. मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही. युतीचा हा केवळ पॅटर्न आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे. युतीमध्ये काही अलबेल नाही. सांस्कृतिक नगरी डोंबिवली चे नाव या लोकांनी खराब करून टाकले. इथल्या लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे.
15 Jan, 26 : 10:22 AM
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.९८ टक्के मतदान
15 Jan, 26 : 10:21 AM
सांगलीत दोन तासात साडेसहा टक्के मतदान
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात ६.४५% मतदान झाले. मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. मतदार यादीतील घोळामुळे अनेक मतदारांना केंद्र शोधताना अडचणी येत आहेत. अनेक मतदारांची नावे यादीतून वगळली गेली आहेत.
15 Jan, 26 : 10:13 AM
पिंपरी-चिंचवड : पहिल्या २ तासांत सरासरी ७ टक्के मतदान
15 Jan, 26 : 10:10 AM
बोटाला शाईच लावली जात नाही; पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर
मतदारांनी मतदान केल्यावर बोटाला शाईच लावली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेलमधील बालाजी शाळेमध्ये हा प्रकार घडला असून याला उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. आता याबाबत प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे असेल
15 Jan, 26 : 10:09 AM
कॅबिनेट मंत्री असून गणेश नाईकांचे नाव मतदान यादीतून गायब, सामान्यांची काय?; रोहित पवारांची टीका
वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी मतदान करणारे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांचं नाव मतदार यादीतून गायब आहे तर त्यांच्या कुटुंबातील तिघांची नावे तीन वेगवेगळ्या केंद्रावर आहेत. राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्यांनाच त्यांचं मतदान कुठं आहे हे माहित नसेल तर सामान्य लोकांना हे कसं कळणार? केवळ सत्तेतील एका पक्षाच्या सोयीसाठी वॉर्ड/प्रभाग रचनेपासूनच याची सुरवात झाली असून मतदारांचे चेहरे आणि आडनाव बघून त्यांना सोयीच्या प्रभागात टाकण्यात आलं. गणेश नाईक साहेब हे सत्तेत असूनही भाजपच्या रणनीतीची शिकार झाले आहेत. संपूर्ण राज्यात हीच अवस्था असून याबाबत निवडणूक आयोगाला जबाबदारी झटकता येणार नाही, उत्तर द्यावं लागेल..!, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी मतदान करणारे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांचं नाव मतदार यादीतून गायब आहे तर त्यांच्या कुटुंबातील तिघांची नावे तीन वेगवेगळ्या केंद्रावर आहेत. राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्यांनाच त्यांचं मतदान कुठं आहे हे माहित नसेल तर सामान्य लोकांना हे कसं कळणार?…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 15, 2026
15 Jan, 26 : 10:03 AM
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मतदानाचा हक्क बजावल्यानंतर live
15 Jan, 26 : 10:02 AM
PUNE LIVE : पुण्याच्या भवानी पेठेत गोंधळ; अजूनही मतदानाला सुरुवात झाली नसल्याचा आरोप
15 Jan, 26 : 09:55 AM
मुंबईत मतदानाच्या दिवशी प्रशासन ऑक्शन मोडवर…
15 Jan, 26 : 09:54 AM
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली येथे मतदानाचा हक्क बजावला
15 Jan, 26 : 09:54 AM
LIVE: ज्येष्ठ नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क, मुंबईकरांना कोणतं आवाहन केलं?
15 Jan, 26 : 09:52 AM
सर्वात अगोदर मी मतदान केले: अंबादास दानवे
सर्वात अगोदर मी मतदान केले. आमचे मतदान निष्ठेचे आणि संघर्षाचे आहे. राडा झाला त्यामुळे रात्रभर झोपलो नाही. १०० उमेदवारांचे फोन आले की कशा पद्धतीने भाजपा पैसे वाटत आहे. पैशाचा माज एकट्या भाजपाला आहे. कामाच्या जोरावर नाही तर पैशावर मतदान भाजपा करत आहे. निवडणूक आयोग कुंभकरणाच्या झोपेत आहे. विकासाचा खोटा फुगा उभा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मुंबईत पण भगवा गार्ड तयार करण्यात आले आहे. काल आमच्या भगवा गार्ड पथकाने अनेक पैसे वाटणारे लोक पकडले आहेत, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
15 Jan, 26 : 09:47 AM
छत्रपती संभाजीनगर: गुजराती कन्या विद्यालयामध्ये गोंधळ, मशीन बंद पडल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ; मशीनमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर मशीन दुरुस्त करण्यास जवळपास एक तास विलंब झाला. नागरिकांना जवळपास एक तास ताटकळत उभे राहावे लागले.
15 Jan, 26 : 09:46 AM
एकट्या लढणाऱ्या काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील: सतेज पाटील
कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे त्यामुळे एकट्या लढणाऱ्या काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील कोल्हापुरात यावे लागले. कोल्हापुरात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. सत्ता असताना देखील दबावाचे राजकारण त्यांना करावे लागते, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.
15 Jan, 26 : 09:39 AM
अकोल्यात EVM मध्ये तांत्रिक बिघाड
अकोल्यात EVM मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रशासनाची मोठी धावपळ होत आहे. दुसरीकडे रांगेत उभ्या असलेल्या मतदारांचा संताप पाहायला मिळतो आहे.
15 Jan, 26 : 09:38 AM
कल्याण: अभिनेता ऋतुराज फडके यांनी बजावला मतदानाचा हक्क. नागरिकांनी मतदान करण्याचे केले आवाहन
15 Jan, 26 : 09:35 AM
मुंबई: मतदानाचा हक्क बजावल्यावर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी दिली प्रतिक्रिया
VIDEO | Mumbai: Legendary cricketer Sachin Tendulkar after casting his vote in the BMC polls highlights the importance of voting.
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
He says, "Voting is very, very important. Just like we say that every single drop matters, similarly, if you want a particular result, every person… pic.twitter.com/Woc6DFj6Ua
15 Jan, 26 : 09:33 AM
अभिनेते, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे बंधू अविनाश गोवारीकर यांनी मतदानानंतर व्यक्त केली खंत
मतदान केल्यानंतर दिग्दर्शक आणि अभिनेता आशुतोष गोवारीकर यांचे बंधू अविनाश गोवारीकर म्हणाले की, मी आज मतदान केले. सर्व काही ठीक आहे, जागा आरामदायक आहे, फक्त मतपत्रिका नसल्याशिवाय इतर कोणतीही अडचण नाही... मला माहित नाही की असे का आहे. यामुळे, लोक त्यांचे मतदार क्रमांक शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे प्रत्येक मतासाठी सुमारे ५ मिनिटे लागत आहेत... इतके लोक इतक्या उत्साहाने आले आहेत, पण त्यांना या लांब रांगांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळे ते परत जात आहेत, हे पाहून मला वाईट वाटत आहे... या वर्षी पक्षांनी मतपत्रिका का वाटल्या नाहीत, हे मला कळत नाही. त्यामुळे हीच एक चिंता आहे...
#WATCH | Mumbai: After voting for Maharashtra civic elections 2026, director and actor Ashutosh Gowariker's brother, Avinash Gowariker, says, "I voted today. Everything is good, the venue is comfortable, there's no problem with anything except the fact that there are no voting… pic.twitter.com/qgy26gKJMZ
— ANI (@ANI) January 15, 2026
15 Jan, 26 : 09:27 AM
नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी कुटुंबासह चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला.
15 Jan, 26 : 09:27 AM
धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या एल एम सरदार उर्दू हायस्कूल येथील बुथ क्रमांक चार वरील पाच नंबर खोलीचे ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांचा मतदान केंद्राबाहेर खोळंबा.
15 Jan, 26 : 09:25 AM
नाशिक - शहरात थंडी वाढली सकाळच्या सत्रात मतदानाला अल्पसा प्रतिसाद...live
15 Jan, 26 : 09:24 AM
अभिनेते नाना पाटेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क, काय म्हणाले?
15 Jan, 26 : 09:21 AM
मीरारोड मध्ये मतदान केंद्रात भाजपचे केंद्र प्रतिनिधी चक्क उमेदवारांच्या नावांचे कार्ड लाऊन बसलेले
मीरारोडच्या शांती नगर प्रभाग २० मधील मतदान केंद्रात भाजपाच्या उमेदवार प्रतिनिधी यांनी छातीवर चारही भाजपा उमेदवार यांचे क्रमवार नावे असलेले कार्ड लावलेली आढळून आली. या विरोधात मनसे उमेदवार यांनी कारवाईची मागणी केली आहे.
शांतीनगर येथील मतदान केंद्रात सकाळ पासून मतदानास सुरुवात झाली. मात्र भाजपा उमेदवार यांचे मतदान केंद्रात कार्यरत असलेले प्रतिनिधी चक्क छातीवर भाजपाच्या उमेदवारांची क्रम निहाय नावे असलेले कार्ड लाऊन बसलेले होते. मनसेच्या उमेदवार दृष्टी घाग आणि मनसेचे पदाधिकारी दिलीप घाग हे जेव्हा मतदान केंद्रात गेले तेव्हा हा प्रकार पाहून त्यांनी संताप व्यक्त केला.
मतदान केंद्रात उघडपणे गैरप्रकार सुरू असताना एकही पोलिस व केंद्रातील अधिकारी यांनी त्यांना रोखले नाही. उलट भाजपा उमेदवारांचा प्रचार करून भ्रष्ट मार्गाने मतदारांवर प्रभाव टाकला जात असल्याचा आरोप घाग यांनी केला.
भाजपाच्या सर्व प्रतिनिधी यांनी उमेदवारांच्या नावांचे कार्ड लावले असताना एकही मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना रोखले का नाही ? असा सवाल केला. पोलिस व पालिका यांनी तत्काळ ह्या प्रतिनिधी आणि उमेदवार वर गुन्हा दाखल करावा. आणि उमेदवारी रद्द करावी अशी मागणी दृष्टी घाग यांनी केली आहे.
15 Jan, 26 : 09:20 AM
मुंबई: खासदार पियूष गोयल यांनी बजावला मतदानाचा हक्क
VIDEO | Mumbai: Union Minister Piyush Goyal leaves after casting his vote in the BMC polls at a polling booth.#BMCpolls#Mumbai#PiyushGoyal
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
(Full VIDEO available on https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/HM1BzJqQHq
15 Jan, 26 : 09:19 AM
मुंबई: भारतरत्न सचिन तेंडुलकर कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रावर पोहोचले
VIDEO| Maharashtra civic polls: Legendary cricketer Sachin Tendulkar, along with his family, casts his vote for BMC elections in Mumbai.
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/dcKhGsOn3L
15 Jan, 26 : 09:17 AM
मुंबई: बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय आणि पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला
15 Jan, 26 : 09:11 AM
नाशिक: मतदार याद्यांचा घोळ मतदान यंत्रात बिघाड सुरुवातीला संथ गतीने मतदान
महानगरपालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजेपासून मतदान सुरू झाले आहे. मात्र, बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांची नावे सापडत नसल्यामुळे किंवा अगोदरच्या मतदान केंद्रा ऐवजी भलत्याच ठिकाणी दूरवरील केंद्रावर मतदाराची नाव असल्यामुळे गोंधळ असल्याचे चित्र आहेत.
काही मतदारांचे प्रभाग देखील बदलण्यात आले असून काहींच्या घराजवळचे मतदान केंद्र सोडून दुसऱ्या प्रभागाच्या हद्दीजवळ मतदान केंद्र देण्यात आले आहेत कुटुंबातील बहुतांशी सदस्यांची फाटाफूट करण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण आहे. अनेक मतदार त्यामुळे मतदान न करताच परत जात आहेत. दरम्यान शहरातील आनंदवली येथील मतदान केंद्रावर ईव्हीएमचा बिघाड झाला तसेच सिडकोतील प्रभाग 25 मध्ये एका मतदान केंद्रावर चार पैकी एकच ईव्हीएम सुरू असल्यामुळे सुमारे तासभर मतदान ठप्प होते अखेरीस नवीन ईव्हीएम आणल्यानंतर मतदान सुरू झाले.
15 Jan, 26 : 09:10 AM
मुंबईत मतदानाला सुरुवात,मतदार केंद्रावर गर्दी किती?
15 Jan, 26 : 09:10 AM
मतदान सुरू होण्याआधी पुणेकरांच्या मतदान केंद्रावर रांगा; पुण्यात परिस्थिती काय? Live
15 Jan, 26 : 09:09 AM
Pune Live : EVM मशीन बाहेर का नेत आहात? प्रभाग २१ मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ
15 Jan, 26 : 09:09 AM
कल्याण डोंबिवलीत काय आहे परिस्थिती?
15 Jan, 26 : 09:08 AM
खासदार संजय पाटील यांनी कुटुंबासह भांडुपच्या गीता हॉल येथे मतदानाचा हक्क बजावला

15 Jan, 26 : 09:06 AM
सोलापूर महानगरपालिकेतील २६ प्रभागातील १०२ नगरसेवकांसाठी मतदान सुरु; पहिल्या टप्प्यात मतदान यंत्र बंद पडल्याच्या अनेक तक्रारी
15 Jan, 26 : 09:06 AM
पुणे: संत नामदेव शाळा, प्रभाग क्रमांक २१, बूथ नंबर ७ मध्ये ही मशीनमध्ये एरर; प्रभाग २६ अभ्यासीका वसंत दादा ( घोरपड़े उद्यान) मतदान केंद्र मशीन बंद असल्यामुळे मतदान प्रक्रिया बंद
15 Jan, 26 : 09:05 AM
पुणे: प्रभाग क्रमांक २१ मध्ये, बूथ नंबर १ सिटी इंटरनॅशनल मशीनमध्ये एरर
15 Jan, 26 : 09:05 AM
पिंपरी महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात; काही ठिकाणी मशिन बंद, मोबाईल बंदीवरून वाद
15 Jan, 26 : 09:04 AM
जालना महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात
जालना महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जालना महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा निवडणूक पार पडत आहे. ६५ जागांसाठी दोन लाख ४५ हजार ९२९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण २९१ केंद्रांवर मतदान होत असून यासाठी ४२ पोलीस आधिकाऱ्यांसह १५०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान याठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी फाईट रंगणार आहे.
15 Jan, 26 : 09:01 AM
मुंबई: अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांनी बजावला मतदानाचा हक्क
#WATCH | Mumbai: After casting her vote for the BMC elections, Actress Twinkle Khanna says, "I think it gives us a sense of control, a little bit of power over the narrative, and I am voting both out of habit and hope. " pic.twitter.com/ygl3FPi5XM
— ANI (@ANI) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:59 AM
केवळ चर्चा करण्यापेक्षा बाहेर पडून मतदान केले पाहिजे: अभिनेता अक्षय कुमार
मुंबई मनपा निवडणुकीबद्दल अभिनेता अक्षय कुमार म्हणाला की, बीएमसी निवडणूक आहे आणि मुंबईकर म्हणून, हा तो दिवस आहे जेव्हा आपल्या हातात रिमोट कंट्रोल असतो. त्यामुळे, नंतर गोष्टी व्यवस्थित नाहीत म्हणून तक्रार करण्यापेक्षा, मुंबईतील सर्व लोकांनी बाहेर पडून मतदान केले पाहिजे. योग्य लोकांना निवडण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. जर तुम्हाला मुंबईचे खरे हिरो व्हायचे असेल, तर केवळ चर्चा करण्याऐवजी तुम्ही बाहेर पडून मतदान केले पाहिजे.
VIDEO | Mumbai: On BMC polls, actor Akshay Kumar says, “Today is the BMC election and, as Mumbaikars, this is the day when we have the remote control. Therefore, all the people of Mumbai must come out and vote, rather than complaining later about things not being in good shape.… pic.twitter.com/CibMsSkTsC
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:57 AM
स्थानिक प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, मतदान करण्याची संधी मिळणे हा एक मोठा सन्मान: चंद्रशेखरन
मुंबई मनपा निवडणुकीबद्दल टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन म्हणाले की, मतदान करण्याची संधी मिळणे हा एक मोठा सन्मान आहे, आणि मी प्रत्येकाला आवाहन करतो व विनंती करतो की त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि मोठ्या संख्येने बाहेर पडावे. स्थानिक प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, आणि बीएमसी निवडणूक होत असल्याचा मला आनंद आहे. मी नवीन प्रशासनाच्या प्रतीक्षेत आहे.
VIDEO | Mumbai: On the BMC polls, Tata Chairperson Natarajan Chandrasekaran says, “It is a great privilege to have the opportunity to vote, and I would encourage and request everyone to exercise their franchise and come out in large numbers. Local issues are extremely important,… pic.twitter.com/mbd80gUF7D
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:55 AM
पुण्यात भाजपा १२५ जागा जिंकेल, महापौर आमचाच असेल; मुरलीधर मोहोळ यांना विश्वास
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केले. पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेसाठी मतदान सुरू आहे. मी माझ्या कुटुंबासोबत येथे आलो आणि माझ्या मतदानाचा हक्क बजावला. मला विश्वास आहे की, पुणेकरांनी गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे महानगरपालिकेने केलेल्या कामाची व्याप्ती पाहिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजवटीत मेट्रो केवळ कागदावर होती, पण आम्ही ती प्रत्यक्षात आणली आणि आज सुमारे दोन लाख लोक मेट्रोने प्रवास करतात. मला विश्वास आहे की आम्ही १२०-१२५ जागा जिंकणार आहोत आणि महापौर भाजपचाच होईल.
VIDEO | Maharashtra Civic Polls 2026: Minister of State Murlidhar Mohol casts his vote for Pune Municipal Corporation elections. He says, "Voting is underway for local bodies and municipal corporation in Pune. I came here alongwith my family and used by right to vote. I believe… pic.twitter.com/Z6EBOePKTs
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:53 AM
मुंबई: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबई मनपा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते राम नाईक म्हणाले की, अनेक वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अखेर होत आहे. म्हणूनच ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. कोणाला किती मते मिळतील याबद्दल मला काही बोलायचे नाही.
#WATCH | Goregaon, Mumbai: After casting his vote for the BMC elections, former Uttar Pradesh Governor and BJP leader Ram Naik says, "After many years, this municipal corporation election is finally being held. That's why this election is so important... I don't want to say… pic.twitter.com/shOvPUhLkc
— ANI (@ANI) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:49 AM
मुंबईत ८३ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेने बजावला मतदानाचा हक्क
#WATCH | Maharashtra: An 83-year-old woman arrived at the polling station in Mumbai to cast her vote in the BMC elections. pic.twitter.com/QiXz3Gvqnu
— ANI (@ANI) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:48 AM
गणेश नाईक यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केले
#WATCH | Navi Mumbai: Maharashtra Minister Ganesh Naik, along with his family, casts his vote at Bonkode Polling Station for the local body polls. pic.twitter.com/ha6wPNKwGi
— ANI (@ANI) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:47 AM
परभणी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील बूथ क्रमांक एक वरील ईव्हीएम मशीन बंद पडले. येथील बॅलेट युनिट चेंज करण्यात आले.
15 Jan, 26 : 08:47 AM
पुण्यात माजी राज्यमंत्र्यांवर पैसे वाटण्याची वेळ; काँग्रेसचा आरोप
माजी राज्यमंत्र्यांवर पैसे वाटण्याची वेळ...
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) January 14, 2026
ऐन संक्रांतीच्या शुभदिनी आपल्या मुलासाठी एका माजी राज्यमंत्र्यांवर घरोघर जाऊन पैसे वाटण्याची वेळ येणे अत्यंत दुर्दैवी आहे. जनतेने आपल्याला संधी दिली होती, तेव्हा आपण प्रामाणिकपणे विकासकामे केली असती, तर आज ही वेळ आली नसती.
ही निवडणूक… pic.twitter.com/qdRxB6w0P8
15 Jan, 26 : 08:45 AM
प्रशासनाच्या माध्यमातून अशा सर्व गोष्टींना आळा घालणे गरजेचे: रवींद्र चव्हाण
डोंबिवलीत पॅनल क्रमांक २९ मध्ये झालेल्या शिवसेना-भाजप राडा प्रकरणावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, खरे तर असे घडणे योग्य नव्हते. येणाऱ्या काळात प्रशासनाच्या माध्यमातून अशा सर्व गोष्टींना आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे.
15 Jan, 26 : 08:44 AM
दुबार मतदारांचा घोळ: किशोरी पेडणेकर
दुबार मतदारांचा घोळ घालून ठेवला, जिवंत नसलेल्या माणसांची नावे घातली. जिवंत असलेल्या माणसांची नावे काढली. मुंबईकरांची दिशाभूल करून मतदान होणार असले तर मतदार हुशार आहेत. नंबर असूनही मला मतदान करताना दीड मिनिटे लागले. आता रांगा वाढल्या की किती वेळ लागेल याचा विचार करा, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
15 Jan, 26 : 08:37 AM
मुंबई: मनसे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी बजावला मतदानाचा हक्क
15 Jan, 26 : 08:36 AM
गणेश नाईकांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
एक तासाच्या धावपळी नंतर अखेर वनमंत्री गणेश नाईक आणि परिवाराचे मतदान पूर्ण, गणेश नाईक यांचे निवडणूक आयोग यंत्रणेच्या घोळावर गंभीर आरोप
15 Jan, 26 : 08:35 AM
धुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड
धुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड झाला असून, मतदान प्रक्रिया खोलबळी. तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणी मशीन बंद. सुमारे वीस मिनिटात मशीन बंद. प्रशासनाच्या वतीने तात्काळ मशीन मधील तांत्रिक अडचण दूर करत पुन्हा मशीन सुरू करण्याचा प्रयत्न
15 Jan, 26 : 08:34 AM
कोल्हापूरमध्ये मोठा खोळंबा, मतदान केंद्रांबाहेर रांगा
कोल्हापूरमध्ये खोळंबला झाला असून अनेक भागात मतदानाला सुरूवात झाल्यानंतर EVM मशीन बंद पडल्या आहेत. मतदारांनी मोठी गर्दी यावेळी मतदान केंद्राबाहेर केली आहे.
15 Jan, 26 : 08:28 AM
भाजप आमदार संजय केळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
आमदार संजय केळकर यांनी सकाळी ७:३० वाजता ठाण्यात आपला मतदानाचा हक्क बजावला. अधिकाधिक लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे केंद्र सरकारला जनतेचा लाभ झाला आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. ठाण्यातील मतदार देखील रेकॉर्डब्रेक यश देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जात-धर्माच्या भेदांपलीकडे जाऊन विकासाकडे पाहून मतदान करावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
15 Jan, 26 : 08:23 AM
पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मतदान केंद्रावर पोहोचले, पी. जोग विद्यालयामध्ये मुरलीधर मोहोळ करणार मतदान
15 Jan, 26 : 08:18 AM
माजी खासदार प्रकाश जावडेकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
#WATCH | Pune, Maharashtra: Former Union Minister and senior BJP leader Prakash Javdekar casts his vote at a polling booth in Balshikshan School, Pune, for Maharashtra local body elections. pic.twitter.com/N2CZOomnZK
— ANI (@ANI) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:04 AM
नागपूर: भय्याजी जोशी यांनी बजावला मतदानाचा हक्क

15 Jan, 26 : 08:00 AM
मुंबईत मतदानाला सुरुवात, मतदान केंद्रावर काय घडतंय?
15 Jan, 26 : 07:59 AM
पुणे: अंकुश काकडे यांनी नोंदवला आक्षेप
तीन मतदान केल्यानंतर चौथा मतदान झाले, तेव्हा लाईट लागला नाही. ईव्हीएम मशीनमध्ये सात वाजून ४४ मिनिट म्हणजे १४ मिनिट जास्त दाखवत आहे, असा आरोप अंकुश काकडे यांनी मतदानाचा हक्क बजावताना केला.
15 Jan, 26 : 07:58 AM
मुंबई: भ्रष्ट व अकार्यक्षम पद्धतीने काम करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विरोधात मतदान करा; मतदानाचा हक्क बजावताच मंत्री आशिष शेलार यांचे मतदारांंना आवाहन
15 Jan, 26 : 07:57 AM
पुणे: रवींद्र धंगेकर आणि मुलाचं औक्षण केलं, कसबा गणपती दर्शनाला निघाले
15 Jan, 26 : 07:56 AM
अमरावती महानगरपालिकेसाठी मतदान, ८७ जागेसाठी तब्बल ६६१ उमेदवार रिंगणात
15 Jan, 26 : 07:54 AM
वसई विरारमध्ये जय श्रीराम आणि जय द्वारकाधीशचे झेंडे
मतदान प्रक्रिया सुरू होत असतानाच वसईमध्ये जय श्रीराम आणि जय द्वारकाधीशचे झेंडे पाहायला मिळाले. वसई वसंत नगरी सर्कल ते एव्हरशाइन पर्यंत हे झेंडे लावण्यात आले आहेत.
15 Jan, 26 : 07:53 AM
जालना महापालिकेसाठी महाविकास आघाडी सोडता इतर सर्वच पक्ष स्वबळावर
जालना महापालिका निवडणुकीसाठी शहरातील जवळपास अडीच लाख मतदार मतदानचा हक्क बजावणार आहे. जालना महापालिकेसाठी महाविकास आघाडी सोडता इतर सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे. १६ प्रभागातील एकूण ६५ जागेसाठी मतदान प्रक्रिया.
15 Jan, 26 : 07:51 AM
कोणत्याही उमेदवाराला मतदान करा: मोहन भागवत
कोणत्याही मतदाराला मतदान करा पण मतदान करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. नागपूर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोहन भागवत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
15 Jan, 26 : 07:47 AM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क

15 Jan, 26 : 07:44 AM
जळगावात मतदानापूर्वी गोंधळ!
जळगाव शहरात मतदान सुरू होण्यापूर्वी एका मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक १५ येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मांडणीचा क्रम चुकल्याचा आरोप उमेदवार प्रतिनिधींनी केला. ईव्हीएम मशीनचा मांडणीचा क्रम नियमांनुसार नसल्याने तो तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी उमेदवार प्रतिनिधींनी केली. यावरून निवडणूक कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळाने निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत उमेदवार प्रतिनिधींची मागणी मान्य केली आणि ईव्हीएम मशीनचा क्रम पुन्हा योग्य पद्धतीने लावण्यात आला.
15 Jan, 26 : 07:42 AM
मुंबई: आमदार आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन.

15 Jan, 26 : 07:28 AM
नागपूर: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मतदान केंद्रावर पोहोचले
VIDEO | Nagpur: RSS Chief Mohan Bhagwat arrives at Bhauji Daptari School to cast his vote in the BMC polls.#BMCpolls#Nagpur#RSS
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
(Full VIDEO available on https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/hzgLMM76KD
15 Jan, 26 : 07:25 AM
पुण्यात मतदानकेंद्र सज्ज, लवकरच मतदानाला सुरुवात
#WATCH | Pune, Maharashtra: Preparations and mock poll underway at a polling booth in New English School on Tilak Road.
— ANI (@ANI) January 15, 2026
Voting will begin from 7.30 am in 29 different Municipal Corporations across Maharashtra today. pic.twitter.com/1Hnk4wrhRS
15 Jan, 26 : 07:16 AM
विधानसभेच्या मतदार याद्या धरल्या ग्राह्य
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकांसाठी वापरल्या जातात.
15 Jan, 26 : 07:16 AM
मतदान केंद्रांबाहेर मतदारांची रांग लागायला सुरुवात
मुंबईत मतदानाला सुरुवात होताच विविध मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या आहेत. सकाळपासूनच नागरिक उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडत असून शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
15 Jan, 26 : 07:15 AM
नांदेडचा किंग कोण...?
माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांचे नांदेडमध्ये वर्चस्व राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदाच भाजपचे नेते म्हणून मतदारांना सामोरे जात असताना 'पक्ष कोणताही असला तरी नांदेडचा किंग मीच' हे सिद्ध करू शकतील का, याकडेही लक्ष लागले आहे.
15 Jan, 26 : 07:14 AM
निवडणुकांसाठी पुरेशा ईव्हीएमची व्यवस्था
निवडणुकांसाठी पुरेशा ईव्हीएमची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ४३ हजार ९५८ कंट्रोल युनिट आणि ८७ हजार ९१६ बॅलेट युनिटचा समावेश आहे.
15 Jan, 26 : 07:14 AM
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १४० 'पाडू' उपलब्ध
मुंबई महापालिका निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्रात मतमोजणीवेळी काही तांत्रिक अडचण आल्यास 'पाडू' (प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) या यंत्राद्वारे निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध असेल. मात्र, 'पाडू'चा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरीत्या त्याचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १४० 'पाडू' उपलब्ध करण्यात आले आहेत.
15 Jan, 26 : 07:13 AM
नवी मुंबईत एकनाथ शिंदे वरचढ की भाजपचे मंत्री गणेश नाईक?
कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई येथे भाजप व शिंदेसेनेत अटीतटीची लढत आहे. नवी मुंबईत एकनाथ शिंदे वरचढ की भाजपचे मंत्री गणेश नाईक ? आणि कल्याण डोंबिवलीत प्राबल्य शिंदेंचे की रवींद्र चव्हाणांचे याचा फैसला होणार आहे.
15 Jan, 26 : 07:12 AM
भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम स्वबळावर
छत्रपती संभाजीनगर येथे अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असलेल्या या महापालिकेवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम स्वबळ अजमावत आहेत.
15 Jan, 26 : 07:12 AM
पक्षांतरामुळे नाशिक महापालिकेची निवडणूक गाजली
लहानमोठ्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे नाशिक महापालिकेची निवडणूक गाजली. भाजपमध्ये अंतर्गत रुसवेफुगवे बघायला मिळाले.
15 Jan, 26 : 07:12 AM
नागपूर महापालिका भाजपचा गड
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन दिग्गज नेत्यांचे होमपिच असलेली नागपूर महापालिका भाजपचा गड मानली जाते. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष असेल.
15 Jan, 26 : 07:11 AM
अजित पवार आणि शरद पवार ही काका-पुतण्याची जोडी भाजपच्या विरोधात
पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांत अजित पवार आणि शरद पवार ही काका-पुतण्याची जोडी भाजपच्या विरोधात एकत्र आल्याने येथील निवडणुका लक्षवेधी ठरल्या आहेत.
15 Jan, 26 : 07:11 AM
मुंबईकर कौल कुणाला देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष
१९ वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू यांच्याविरोधात भाजप आणि शिंदेसेनेची महायुती अशी लढत असताना मुंबईकर कौल कुणाला देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
15 Jan, 26 : 07:10 AM
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस
सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या आणि अनेक वर्षांनी होत असलेल्या राज्यातील मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठीचे मतदान गुरुवारी होत आहे. ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार हे १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद करतील.