शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात मिळाली अडीच लाख स्मार्ट मते

By admin | Updated: October 12, 2015 01:40 IST

केंद्र शासनाकडे सादर करावयाच्या स्मार्ट सिटी प्रस्तावासाठी पुणेकरांची मते जाणून घेतली जात आहेत, दुसऱ्या टप्प्यासाठी एका दिवसात नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत

पुणे : केंद्र शासनाकडे सादर करावयाच्या स्मार्ट सिटी प्रस्तावासाठी पुणेकरांची मते जाणून घेतली जात आहेत, दुसऱ्या टप्प्यासाठी एका दिवसात नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत वेगवेगळ्या ६ क्षेत्रांसाठी अडीच लाख मते (प्राधान्यक्रम) नोंदविली. पालिकेकडे एकूण ९ लाख २४ हजार ८२६ मते जमा झाली आहेत. या मताच्या आधारे स्मार्ट पुणे कसे असेल याचा आराखडा तयार केला जाणार आहे.महापालिकेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात वाहतूक, पाणी व मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, सुरक्षितता, ऊर्जा या विषयांवर नागरिकांची आॅनलाइन मते मागविली होती. ३ ते ११ आॅक्टोबर २०१५ या कालावधीमध्ये ही मते जाणून घेण्यात आली. आॅनलाइन पद्धतीने मते जाणून घेण्यासाठी या सर्व्हेक्षणामध्ये महापालिकेचे कमर्चारी, महाविद्यालयांतील विद्यार्थी असे सुमारे ८०० स्वयंसेवक त्यात सहभागी झाले आहेत. आतापर्यंत या सर्व्हेक्षणात एकूण ६६ हजार ३०१ जणांनी सहभाग घेतला. स्मार्ट सिटीच्या संकेतस्थळाला एकूण १ लाख ९५ हजार ३२६ हिट्स मिळाल्या. पहिल्या टप्प्यातही पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद देऊन आपली मते व्यक्त केली होती. नागरिकांच्या मतांच्या आधारे स्मार्ट पुण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. परदेशातील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा समावेशही करण्याचा प्रयत्न केला जात आहे.< नागरिक सहभागात पुणे आघाडीवर१ स्मार्ट सिटी कशी असावी यामध्ये नागरिकांचा सहभाग असणे बंधनकारक आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवडल्या गेलेल्या सर्व १०० शहरांमध्ये नागरिकांचा सहभाग मिळविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.२ नागरिकांच्या सहभागामध्ये पुणे देशात सर्वात आघाडीवर आहे. आतापर्यंत पहिला व दुसरा टप्पा मिळून १० लाखांच्यावर नागरिकांनी याकरिता आपली मते नोंदविली आहे.३ नागरिकांच्या सहभागाला जास्त गुण ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या २० शहरांत निवड होण्यासाठी पुण्याचा दावा भक्कम मानला जात आहे.