शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
3
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
4
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
5
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
6
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
7
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
8
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
10
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
11
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
12
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
13
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
14
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
15
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
16
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
17
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
18
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
19
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
20
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
Daily Top 2Weekly Top 5

बाराशे किलोमीटर अवघ्या ९० तासांत

By admin | Updated: September 14, 2015 04:53 IST

मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कसोटी पाहणारी ‘पॅरिस- ब्रेस्ट-पॅरिस’ सायकल शर्यत पुण्यातील ४ सायकलप्रेमींनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

मिलिंद कांबळे, पिंपरी-चिंचवडमानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कसोटी पाहणारी ‘पॅरिस- ब्रेस्ट-पॅरिस’ सायकल शर्यत पुण्यातील ४ सायकलप्रेमींनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. अवघ्या ९० तासांत १ हजार २३० किलोमीटर अंतराचा प्रवास करून त्यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे.अ‍ॅडॉक्स क्लब पॅरिसियनमार्फत गेल्या महिन्यात ही स्पर्धा पॅरिस (फ्रान्स) येथे झाली. चार वर्षांतून एकदा होणारी ही खडतर सायकल स्पर्धा जगात प्रसिद्ध आहे. ही स्पर्धा म्हणजे सायकलपटूंच्या शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीची परीक्षा मानली जाते. कारण, स्पर्धेचा संपूर्ण मार्ग डोंगराळ असतो. एक डोंगर उतरला, की समोर दुसरा डोंगर उभाच, असे असंख्य डोंगर चढावे-उतरावे लागतात. या स्पर्धेत जगभरातील ६ हजार स्पर्धकांना प्रवेश मिळाला होता. भारतातून सहभागी झालेल्या ५५ पैकी २० स्पर्धक यशस्वी ठरले. २०११ च्या स्पर्धेत १५ पैकी केवळ मुंबईचे कैलास पाटील यांनी शर्यत पूर्ण केली होती. पुण्यातून ११ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांत हिरेन पटेल, अपूर्व वर्मा, डॉ. बबन डोळस आणि डॉ. प्रकाश दुबे-पाटील या चौघांनी शर्यत पूर्ण करून विक्रमी कामगिरी नोंदवली. थंडी, पावसाची रिपरिप व निसरडे रस्ते अशा प्रतिकूल वातावरणात ही सायकलची चढाई होती. एकूण शर्यतीत ३६ हजार फूट उंची गाठली गेली. मार्गावरील १९ चेकिंग पॉर्इंटवर वेळेत न पोहोचल्यास शर्यतीतून बाद होण्याच्या भीतीने सर्वांनाच तेथे वेळेत रिपोर्टिंगची कसरत करावी लागत होती. प्रत्येक ठिकाणी मासांहारी पदार्थ असल्याने आहाराची गैरसोय झाली. चहा किंवा कॉफीसोबत ब्रेड, केळी, सफरचंद आणि पाण्यातून इलेक्ट्रॉल पावडर घेऊन या स्पर्धकांनी आपली भूक भागविली. झोप न घेता दिवस-रात्र केवळ सायकल चालविल्याने शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक खच्चीकरणही होत होते.