शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

घोड्यांच्या शर्यती करा बंद

By admin | Updated: February 14, 2015 22:55 IST

ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीला बंदी, तर शहरात घोड्यांच्या शर्यतींना परवानगी, अशा पद्धतीचा कारभार राज्यात सुरू आहे.

लेण्याद्री : ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीला बंदी, तर शहरात घोड्यांच्या शर्यतींना परवानगी, अशा पद्धतीचा कारभार राज्यात सुरू आहे. त्यामुळे यापुढे राज्यातील सर्व घोड्यांच्या रेस शिवसेना बंद करणार असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात लक्ष घातले आहे, अशी माहिती खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी येथे दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य आणि देशभरातील बैलगाडा शर्यती सध्या बंद आहेत. बैल जंगली प्राणी असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने सन २०११ मध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली. जंगली प्राण्यांच्या यादीतून बैलाला वगळण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाकडे अनेक दिवस प्रलंबित आहे. याप्रकरणी मागील पाच महिन्यांपासून पर्यावरणमंत्री ते थेट लोकसभा सभागृह असा आवाज उठवूनही भाजपा सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाही. एकीकडे केंद्र सरकार सामान्य शेतकऱ्यांच्या बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी बैलांना जंगली यादीतून काढून टाकण्यासाठी कुठलाही निर्णय घेत नसताना राज्यात श्रीमंत वर्गाचा शोक असलेला व कोट्यावधी रुपयांची सट्टेबाजी होणाऱ्या घोड्यांच्या शर्यती मात्र बेधडक सुरू आहेत. बैलगाडा शर्यतींवर जिल्ह्यातील यात्रांची अर्थव्यवस्था अवलंबून असताना त्याबाबत निर्णय होत नाही. त्यामुळे घोड्यांच्या रेस बंद करण्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे खासदार आढळराव यांनी सांगितले. घोड्यांच्या रेस बंद करण्याच्या इशाऱ्याचे पत्र पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पाठविले जाणार आहे. बैलगाडा शर्यत बंद झाल्याने बैलांची रवानगी कत्तलखान्यात होण्याचा धोका आहे. पुनर्याचिकेचा निकाल लवकरचसर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर आपण लगेचच पुनर्याचिका दाखल केली. याचा निर्णय लवकरच बैलगाडा शौकिनांसारखा लागेल, असा आशावाद खासदार आढळराव यांनी व्यक्त केला.४याबाबत राज्यातील कत्तलखान्यावरदेखील लक्ष ठेवणार असल्याचे आढळराव यांनी सांगितले. घोड्याच्या शर्यतीसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात करही वसूल केला जातो. तसेच, घोड्याचे अतोनात हालदेखील केले जातात. त्यामुळे अशा घोड्याच्या बेकायदेशीर स्पर्धा शिवसेना यापुढे करू न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आढळराव-पाटील यांनी दिली.