ट्रकचे चाक डोक्यावरून गेले; दुचाकी - ट्रकच्या धडकेत वडिलांसमोरच चिमुकल्याचा मृत्यू, कात्रजमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 11:26 IST2026-02-28T11:24:17+5:302026-02-28T11:26:25+5:30

आठ दिवसापूर्वीच याठिकाणी कात्रज डेअरी समोर अपघात झाला होता, यामध्ये एका तरुणीला जीव गमवावा लागला होता

Truck wheel went over head; 5-year-old boy dies in front of father in bike-truck collision, incident in Katraj | ट्रकचे चाक डोक्यावरून गेले; दुचाकी - ट्रकच्या धडकेत वडिलांसमोरच चिमुकल्याचा मृत्यू, कात्रजमधील घटना

ट्रकचे चाक डोक्यावरून गेले; दुचाकी - ट्रकच्या धडकेत वडिलांसमोरच चिमुकल्याचा मृत्यू, कात्रजमधील घटना

कात्रज: कात्रज व परिसरामध्ये अपघातांचे सत्र सुरूच असताना शनिवारी सकाळी ०९: ०० च्या दरम्यान वंडर सिटी समोर कात्रज कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ट्रक आणि दुचाकी या वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी वरील एका ३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अंश भाऊरंग कांबळे (वय ३ वर्ष, रा. अंजनी नगर कात्रज) असे या मुलाचे नाव आहे. ट्रक चालक इंद्रजित बाबुराव जानते (वय ५० वर्ष रा.लातूर)  याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वडील अंशला घेऊन जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये मुलाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने मुलाचा जागेवर मृत्यू झाला. भारती विदयापीठ पोलीस व वाहतूक पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे. आठ दिवसापूर्वीच कात्रज डेअरी समोर अपघात झाला होता. यामध्ये एका तरुणीला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे कात्रज व परिसरातील अपघात सत्र थांबणार कधी असा सवाल विचारला जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची येजा सुरू असते. त्यातच रस्ताही निसरडा असतो. त्यामुळे या अगोदर देखील अनेक अपघात झाले असून यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title : कात्रज: पिता के सामने ट्रक दुर्घटना में बच्चे की मौत

Web Summary : कात्रज में एक दुखद घटना में, एक तीन वर्षीय बच्चे की ट्रक से कुचलकर मौत हो गई। दुर्घटना पिता के सामने हुई। पुलिस ने ट्रक चालक को गिरफ्तार कर लिया है। स्थानीय लोग लगातार दुर्घटनाओं के कारण सुरक्षा उपायों की मांग कर रहे हैं।

Web Title : Katraj: Boy Dies in Truck Accident Before Father's Eyes

Web Summary : A three-year-old boy died in Katraj after a truck ran over him during a two-wheeler accident. The father witnessed the tragic event. Police have arrested the truck driver. Locals demand safety measures due to frequent accidents.