शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याकडे दुर्लक्ष आले अंगलट

By admin | Updated: January 22, 2015 00:43 IST

कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, सोसायटीमधील कचरा प्रकल्प बंद ठेवणे या बाबींकडे दुर्लक्ष करणे शहरातील ५०० जणांना महागात पडले आहे.

पुणे : कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, सोसायटीमधील कचरा प्रकल्प बंद ठेवणे या बाबींकडे दुर्लक्ष करणे शहरातील ५०० जणांना महागात पडले आहे. या नागरिकांच्या विरोधात महापालिकेने थेट न्यायालयात खटले दाखल केले असून, आणखी ७०० जणांच्या विरोधात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. शहरातील कचरा शहरातच जिरविण्यासाठी महापालिकेने कडक उपाययोजना केल्या असून, त्या अंतर्गत ही कारवाई सुरू केली आहे. उरूळी देवाची येथील कचराडेपो विरोधातील आंदोलन ग्रामस्थांनी मागे घतले असते, तरी महापालिकेकडून गेल्या दोन आठवडयात या डेपोवर एकही गाडी कचरा पाठविलेला नाही. त्यामुळे प्रशासनाकडून शहरातच कचऱ्याचे वर्गीकरण करून तो शहरातच जिरविण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. त्या अंतर्गत सोसयटया तसेच नागरिकांना ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. तर शहरातील अनेक सोसायटयांनी कचरा प्रक्रीया प्रकल्प उभारले असून ते दाखवून करात सवलत घेतलेली आहे. तर सध्या हे प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे महापालिकेने अशा सोसायटयांवर कारवाई सुरू केली आहे. त्या बरोबरच रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा वर्गीकरण करून न देणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे असे उपद्रव करणारे सुमारे १२००जणांवर खटला दाखल करण्याची प्रक्रीया महापालिकेने दोन आठवडयापासून सुरू केली आहे. त्या अंतर्गत आज अखेर पर्यंत सुमारे ५०० जणांवर खटले दाखल करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागाकडून देण्यात आली. कचरा डेपो विरोधातील आंदोलन ग्रामस्थांनी मागे घेतले असले, तरी अद्याप ८ जानेवारीपासून शहरातील एकही कचरागाडी डेपोवर गेली नाही. कचरा वर्गीकरणाची शिस्त, शहरातच कचऱ्याची विल्हेवाट लावणे, तसेच वर्गीकरण केलेला कचरा शेतकऱ्यांना देणे यांमुळे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या तब्बल १६०० टन कचऱ्यामधील १२०० टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे महापालिकेस शक्य होत आहे. तसेच यात आणखी सुधारणा करण्याचे प्रयत्न करून १०० टक्के कचरा शहरातच जिरविण्याचे उद्दिष्ट असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.