दारु पिऊन पीएसआयचे वाहतूक नियमन; पोलिस उपायुक्तांकडून तडकाफडकी निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:51 IST2025-07-03T17:51:22+5:302025-07-03T17:51:30+5:30

पोलिसाने बेशिस्त बेजबाबदारपणाचे व पोलिस खात्याला अशोभनीय असे गैरवर्तन करून अत्यंत गंभीर स्वरुपाची कसुरी करत पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केली

Traffic regulation of PSI after drinking alcohol; Sudden suspension by Deputy Commissioner of Police | दारु पिऊन पीएसआयचे वाहतूक नियमन; पोलिस उपायुक्तांकडून तडकाफडकी निलंबन

दारु पिऊन पीएसआयचे वाहतूक नियमन; पोलिस उपायुक्तांकडून तडकाफडकी निलंबन

पुणे : मद्यप्राशन करून कर्तव्यावर आलेल्या श्रेणी पोलिस उपनिरीक्षकावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्याचे पोलिस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे. संजय सुधाकर माटेकर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले.

श्रेणी पोलिस उपनिरीक्षक माटेकर हा लष्कर वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. २९ जुलै रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास तो ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या कारवाईसाठी कर्तव्यावर होता. त्याने कारवाईसाठी एक चारचाकी गाडी थांबवली. गाडीतील तिघा व्यक्तींसोबत वाद घातला. दरम्यान, यावेळी माटेकर याने दारु प्यायली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर माटेकर याच्याविरोधात कर्तव्याच्या ठिकाणी दारूचे सेवन केल्यामुळे लष्कर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माटेकर याने कर्तव्य पार पाडत असताना, बेशिस्त बेजबाबदारपणाचे व पोलिस खात्याला अशोभनीय असे गैरवर्तन करून अत्यंत गंभीर स्वरुपाची कसुरी केल्याने, पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत त्याला निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: Traffic regulation of PSI after drinking alcohol; Sudden suspension by Deputy Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.