१ मे पासून टॉरंट कंपनीचा गॅस पुरवठा होणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:00 IST2025-04-30T13:00:03+5:302025-04-30T13:00:16+5:30
ग्राहकांना व पंप चालकांना त्रास होत असून हा निर्णय व्यापक जनहितासाठी घेण्यात आला असल्याचे असोसिएशनने सांगितले आहे

१ मे पासून टॉरंट कंपनीचा गॅस पुरवठा होणार बंद
पुणे: पुणे ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर ट्रक मार्फत टॉरंट कंपनीचा गॅस पुरवठा होते, त्या ठिकाणी एक मे पासून गॅस विक्री बंद केली जाणार असल्याची माहिती पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे ध्रुव रूपरेल यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गॅस पुरवठामध्ये होणाऱ्या अडचणींमुळे सीएनजी पंप मालकांना ग्राहकांची लांब रांगा आणि इतर अडचणी हाताळताना फार त्रास सहन करावा लागत आहे. अनेक तक्रारी व पाठपुरावा करूनही टॉरंट गॅसने हा प्रश्न सोडविण्यास लक्ष दिलेले नाही. त्यामुळे ग्राहकांना व पंप चालकांना त्रास होत आहे. हा निर्णय व्यापक जनहितासाठी घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व संबंधित अधिकार्यांकडे सीएनजी पुरवठा अखंड राहावा व नागरिकांना पुढील त्रास टाळता यावी यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी पुणे पेट्रोल डिलर असोसिएशन कडून करण्यात आली आहे.