शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बाजारभावाअभावी टोमॅटो मातीमोल

By admin | Updated: January 23, 2017 02:41 IST

कांद्याने रडवले, बटाट्याने फुगवले तर टोमॅटोने फसवले अशी अवस्था सध्या शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.

शिक्रापूर : कांद्याने रडवले, बटाट्याने फुगवले तर टोमॅटोने फसवले अशी अवस्था सध्या शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. माझरे मळा या भागातील शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील पाबळ, केंदूर, धामारी, खैरेनगर आदी गावांमध्ये मागील काही वर्षांत थिटेवाडी बंधाऱ्याचे वरदान लाभले. त्यातच काहीशा बागायत व जिरायत क्षेत्रावर सालचंदी ठरवणारा या भागातील शेतकरी मागील काही महिन्यांत शेतमालाच्या बाजारभावाने अडचणीत आला आहे. मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड या भागात झाली. कांद्याला बाजारभाव कोसळल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले. कांद्याने रडवल्याची भावना पाबळ येथील शेतकरी धनेश साकोरे यांनी व्यक्त केली, तर बटाट्यासाठी अनेकांनी पुणे जिल्ह्याबरोबर बाहेरील परराज्यांतून, राज्यातून कर्ज काढून बियाणे आणून बटाट्याची लागवड केली. काढणी झाल्यानंतर बटाट्याचे बाजारभाव कोसळले. कर्जाचा फुगवटा वाढला. कर्जाने शेतकऱ्यांना फुुगवले. त्यापाठोपाठ आता टोमॅटोने या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक टोमॅटो लागवड करणारे अनेक प्रगत शेतकरी मेटाकुटीला आले असल्याचे प्रगतशील शेतकरी पांडुरंग लोखंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कर्जबाजारी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांदा, बटाट्याबरोबरच आता टोमॅटोनेदेखील फसवल्याने इतर तरकारी पिकांकडे या भागातील शेतकरी वळला आहे. वर्षाची सालचंदी धोक्यात आल्याने अनेक शेतकरी कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडली आहेत. (वार्ताहर)