सणसवाडीत कंटेनरचालकाला तिघांनी लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST2021-09-02T04:23:24+5:302021-09-02T04:23:24+5:30

सणसवाडी येथील फेबर कंपनीमधील माल घेऊन जाण्यासाठी (एमएच १२ केपी ५५२७) हा कंटेनर घेऊन चालक अमितकुमार शुक्ला ...

The three robbed the container driver in Sanaswadi | सणसवाडीत कंटेनरचालकाला तिघांनी लुटले

सणसवाडीत कंटेनरचालकाला तिघांनी लुटले

सणसवाडी येथील फेबर कंपनीमधील माल घेऊन जाण्यासाठी (एमएच १२ केपी ५५२७) हा कंटेनर घेऊन चालक अमितकुमार शुक्ला हे ३१ ऑगस्ट रोजी आलेले होते. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पॉलीबॉंड कंपनीच्या गेट समोरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघा युवकांनी शुक्ला यांच्या कंटेनरला हात करून कंटेनर अडविला. याचवेळी दोघे जण कंटेनरमध्ये घुसले आणि त्यांनी चालक शुक्ला यांना हाताने, लाथाबुक्यानी मारहाण करत शिवीगाळ करून त्यांच्या जवळील पंधरा हजार सहाशे रुपये बळजबरीने काढून घेतले. आणि त्यांनी आणलेल्या दुचाकीहून पळून गेले. याबाबत अमितकुमार लल्लनप्रसाद शुक्ला (वय ३५ वर्षे रा. पटहनखेडा, उत्तर प्रदेश) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी तीन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल केले. तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहेत.

Web Title: The three robbed the container driver in Sanaswadi