ज्यांना राजकारण करायचं आहे, त्यांना करू द्या, देशातील जनता निश्चितपणे मोदींसोबतच - मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 14:33 IST2026-05-14T14:32:41+5:302026-05-14T14:33:31+5:30

अशा वेळी सगळ्यांनी एकत्र मिळून या संकटाचा सामना केला पाहिजे, एकत्र येऊन काम केलं पाहिजे, पण ठीक आहे ज्याला राजकारण करायचं त्याला राजकारण करू द्या

Those who want to do politics, let them do it, the people of the country are definitely with Modi - Muralidhar Mohol | ज्यांना राजकारण करायचं आहे, त्यांना करू द्या, देशातील जनता निश्चितपणे मोदींसोबतच - मुरलीधर मोहोळ

ज्यांना राजकारण करायचं आहे, त्यांना करू द्या, देशातील जनता निश्चितपणे मोदींसोबतच - मुरलीधर मोहोळ

पुणे: पंतप्रधान मोदींनी देशहितासाठी आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी इंधन वाचवण्याचे आवाहन केलं आहे. राजकारण करणाऱ्यांकडे दुसरे काहीच नाही. म्हणून ते राजकारण करत आहेत. आपण नाही तर संपूर्ण जग संकटात आहे. अशा वेळी मला वाटत सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायला हवे असे म्हणत खासदार मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.  

मोहोळ म्हणाले, आखाती देशांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून युद्ध आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये इंधन पुरवठा साखळीवरती परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. हे आपण सगळेजण जाणतो आहोत. स्वाभाविकपणे देशात नाहीतर संपूर्ण जगामध्ये एक संकट निर्माण झालंय. तर भविष्यामध्ये याचा विचार करता सहा महिन्यासाठी माननीय प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांना आवाहन केल आहे. आपण प्रत्येकाने जर ठरवून या गोष्टी केल्या तर निश्चितपणे आज कच्च्या तेलासाठी परकीय चलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरावं लागतं. ती आपली बचत होईल. आजही जगातली सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून आपल्या देशाकडं पाहिलं जातं आणि जे सत्य आहे.

निश्चितपणे देशहितासाठी अर्थव्यवस्था अधिक मजबूत राहण्यासाठी माननीय प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांना जे आवाहन केलंय. निश्चितपणे मोदीजींना देशवासीय साथ देतील. राजकारण करणाऱ्यांना करू द्या शेवटी त्यांच्याकडे दुसरं काही नाहीये. त्यामुळे या गोष्टीत तरी किमान राजकारण करू नये. आता एका अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत की, आपल्याकडेच नाही तर जगामध्ये संकट आहे. त्यावेळेला मला असं वाटतं की, सगळ्यांनी एकत्र मिळून त्याचा सामना केला पाहिजे. एकत्र येऊन काम केलं पाहिजे. पण ठीक आहे ज्याला राजकारण करायचं त्याला राजकारण करू द्या पण निश्चित या देशातील जनता मोदीजींसोबत आहे.

Web Title : जनता मोदी के साथ, राजनीति करने वालों को करने दो: मोहोल

Web Summary : सांसद मोहोल ने वैश्विक संकट के बीच एकजुटता का आग्रह किया, पीएम मोदी की ईंधन बचाने की अपील का समर्थन किया ताकि अर्थव्यवस्था मजबूत हो। उन्होंने इस मुद्दे का राजनीतिकरण करने वालों की आलोचना की और युद्ध के कारण वैश्विक आर्थिक चुनौतियों पर प्रकाश डाला।

Web Title : People are with Modi, let them do politics: Mohol

Web Summary : MP Mohol urges unity amid global crisis, backing PM Modi's fuel-saving appeal for a stronger economy. He criticized those politicizing the issue and highlighted global economic challenges due to war.