चोरट्यांची पळापळ; चार घरफोडे अटकेत

By Admin | Updated: June 13, 2015 22:39 IST2015-06-13T22:39:34+5:302015-06-13T22:39:34+5:30

सासवडमध्ये चोरी व घरफोडीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.

Thieves escape; Four detainees detained | चोरट्यांची पळापळ; चार घरफोडे अटकेत

चोरट्यांची पळापळ; चार घरफोडे अटकेत


वाघापूर : सासवडमध्ये चोरी व घरफोडीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सासवड परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ केल्यानंतर अवघ्या एका दिवसात चार चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वीच मोबाईल शॉपी फोडल्याचे तपासात कबूल केले आहे. दरम्यान, या चौघांच्या पोलिस कोठडीदरम्यान अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. तब्बल २२ मोबाईल संच आणि रिचार्ज कार्डसह पान टपरीतील साहित्य असा सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरेंद्रसिंग गौड यांनी दिली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे : विशाल ऊर्फ सागर ऊर्फ घाऱ्या विजय सातपुते (वय २२, रा. साडेसतरा नळी, तुपेवाडा सर्व्हे नं. २०३ हडपसर, मुळ रा. घुडेगाव, ता. पाटण, जि. सातारा), महेश सुभाष थोरात (वय २७, रा. कराड आगाशिवनगर शिवदर्शन कॉलनी, ता. कराड जि. सातारा), सोनू मुरलीधर दुधाळ (वय २२ रा. वैद्यवाडी, कोलेटी बेकरीसमोर, मुळा पाटबंधारे कॉलनी, हडपसर) आणि चेतन दयानंद कुंदन (वय १९, रा. सय्यदनगर, ससाणेवस्ती, हडपसर, पुणे).
दरम्यान या चौघांना प्रथम दोन दिवसांची, त्यानंतर पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी दिल्यानंतर आता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत म्हणजे पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात
आली आहे.

Web Title: Thieves escape; Four detainees detained