खेडमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट... पोलिसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:28+5:302021-07-07T04:12:28+5:30

कडूस आर. बी. कृष्णाजी फार्म येथून पोकलँण्डच्या बॅटऱ्या तसेच इतर साहित्य असा १० हजार किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. चिखलगाव ...

Thieves are rampant in Khed ... Police neglect | खेडमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट... पोलिसांचे दुर्लक्ष

खेडमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट... पोलिसांचे दुर्लक्ष

कडूस आर. बी. कृष्णाजी फार्म येथून पोकलँण्डच्या बॅटऱ्या तसेच इतर साहित्य असा १० हजार किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. चिखलगाव लक्ष्मण रामभाऊ मुके (रा चिखलगाव) यांनी आराळा नदीचे किनारीलगत बसविलेल्या कृषी मोटारीचे १० हजार रुपये किमतीची पाचशे फुट लांबीची तांब्याचे तारा असलेली केबल अज्ञात चोरट्याने लांबवली. मागील महिन्यात मांजरेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी भीमा नदीवरील दोन शेतकऱ्यांचे विद्युत पंप चोरून नेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. चार दिवसांपूर्वी गारगोटवाडी येथे मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी देवाचे चांदीचे दागिने लाबविले. तसेच घनवटवाडी येथेही चोरट्यांनी मंदिरात प्रवेश देवाची चांदीची मूर्ती व मुखवटा लांबविला या दोन्ही घटनेत सुमारे १ लाख १४ हजारांचा ऐवज चोरीला गेला.

Web Title: Thieves are rampant in Khed ... Police neglect