शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातील रस्ता झालाच पाहिजे

By admin | Updated: January 18, 2015 01:21 IST

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विठ्ठलवाडी ते वारजे या मार्गावर नदीपात्रात बांधण्यात येणाऱ्या रस्त्यास हरित लवादाने परवानगी नाकारली आहे.

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विठ्ठलवाडी ते वारजे या मार्गावर नदीपात्रात बांधण्यात येणाऱ्या रस्त्यास हरित लवादाने परवानगी नाकारली आहे. मात्र, हा रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा असून, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पालिकेने भूमिका मांडावी व रस्ता सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी पक्षाच्या वतीने शनिवारी हिंगणे चौकात धरणे आंदोलन केले. आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. स्थानिक नगरसेवक श्रीकांत जगताप यांच्यासह स्थानिक नागरिक या वेळी उपस्थित होते. नदीपात्रातील रस्ता काढल्यास नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी घुसणार आहे. न्यायालयाचा सन्मान राखून महापालिकेने योग्य तोडगा काढावा, तसेच सिंहगड रस्त्यास पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या वेळी आंदोलकांकडून करण्यात आली. ही मागणी राज्य शासनाकडे करण्यासाठी आमदार मिसाळ आणि तापकीर यांना निवेदन देण्यात आले. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात जाऊन महापालिकेने या निर्णयातून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)