शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

जमीन हस्तांतराबाबत तोडगा नाहीच

By admin | Updated: January 19, 2015 00:09 IST

का-हाटी (ता. बारामती) येथील कृषी उद्योग मूलशिक्षण संस्थेच्या जमीन हस्तांतराबाबत तोडगा काढण्यासाठी बारामती येथे रविवारी (दि १८) आयोजित बैठक निष्फळ ठरली

बारामती : का-हाटी (ता. बारामती) येथील कृषी उद्योग मूलशिक्षण संस्थेच्या जमीन हस्तांतराबाबत तोडगा काढण्यासाठी बारामती येथे रविवारी (दि १८) आयोजित बैठक निष्फळ ठरली. याबाबतचा निर्णय फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत टोलविण्यात आला आहे. बारामती तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त होता. या वेळी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. काऱ्हाटी (ता. बारामती) येथील कृषी उद्योग मूलशिक्षण संस्थेची जमीन विद्या प्रतिष्ठानला जोडण्यात आलेल्या ७३ एकर ७ गुंठे जमिनीच्या हस्तांतरणाबाबत निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळाची बैठक आज बारामती तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. दोन तासांहून अधिक काळ ही बैठक सुरू होती. बैठकीनंतर कार्यालयाबाहेर पडलेल्या पवार यांनी पत्रकारांशी अधिक भाष्य करणे टाळले. ते म्हणाले, बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बैठकीची माहिती सचिव देतील, तर सचिव अ‍ॅड. भगवान खारतोडे यांनीदेखील बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ‘सांगण्यासारखे विशेष काही नाही,’ असे सांगून त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.दरम्यान, उपाध्यक्ष अरविंद वाबळे यांनी सांगितले, की आजच्या बैठकीत आॅडिट रिपोर्ट, अंदाजपत्रक मंजूर करणे, २००७मध्ये झालेल्या जमीन हस्तांतरणाबाबत फेरविचार करणे आदी विषय होते. त्यापैकी विद्या प्रतिष्ठानला केलेल्या जमीन हस्तांतरणाबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येणार आहे. या सभेला सर्व अधिकार असतात, अशी सूचना पवार यांनी केली आहे. अधिवेशनापूर्वी फेब्रुवारी, मार्चमध्ये ही सभा होईल. या सभेतच जमीन हस्तांतरणाबाबत निर्णय होईल. जमीन विद्या प्रतिष्ठानकडे हस्तांतरित होऊ नये, अशी माझी व ग्रामस्थांची भूमिका असल्याचेदेखील वाबळे म्हणाले. जमीन परत देण्याची पवार यांनी तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी भराव्या लागणाऱ्या रकमेबाबत पवार यांनी विचारणा केल्याचे ते म्हणाले. महसुलाची रक्कम भरण्यासाठी निधी संकलन सुरू असल्याचे वाबळे यांनी सांगितले.