पुण्यात वास्तविक गॅसचा कोणताही तुटवडा नाही; भीतीने नागरिक पॅनिक, बुकिंगमध्ये चौपट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 10:09 IST2026-03-12T10:09:12+5:302026-03-12T10:09:45+5:30

शहरात गॅसटंचाई निर्माण झाली असल्याच्या अफवेतून एका एजन्सीचा बुकिंगचा आकडा अचानक हजारांच्या पुढे गेला आहे

There is no real shortage of gas in Pune; Citizens panic due to fear, bookings increase fourfold | पुण्यात वास्तविक गॅसचा कोणताही तुटवडा नाही; भीतीने नागरिक पॅनिक, बुकिंगमध्ये चौपट वाढ

पुण्यात वास्तविक गॅसचा कोणताही तुटवडा नाही; भीतीने नागरिक पॅनिक, बुकिंगमध्ये चौपट वाढ

पुणे : युद्धाच्या परिणामामुळे शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होण्याच्या शक्यतेने नागरिक पॅनिक झाले असून, गॅस सिलिंडर संपण्याच्या भीतीने नागरिक आगाऊ साठवणूक करत आहेत. बुकिंग नसतानाही अनेक जण दुकानासमोर उभे राहत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून, नेहमीपेक्षा गॅस सिलिंडरच्या बुकिंगमध्ये चौपटीने वाढ झाली आहे. शहरात गॅसटंचाई निर्माण झाली असल्याच्या अफवेतून गॅस वितरकांच्या दुकानासमोर रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घरात दोन गॅस असूनही, तिसरा गॅस मिळवण्यासाठी ग्राहकांची सध्या धडपड सुरू आहे. मात्र कोथरूड येथील एच. पी. गॅस वितरक विशाल सपत म्हणाले की लोक विनाकारण पॅनिक झाले आहेत. पूर्वी गॅस बुकिंग ४०० पर्यंत होत होते. मात्र आता बुकिंगचा आकडा १७०० पर्यंत गेला आहे. वास्तविक गॅसचा कोणताही तुटवडा नाही. केवळ व्यावसायिक गॅस देणे बंद करण्यात आले आहे.

मेसमध्ये चुलीवर स्वयंपाकाची वेळ

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त राज्यभरातून लाखो तरुण-तरुणी येत असतात. या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय शहरातील विविध मेसच्या माध्यमातून केली जाते. मात्र, सध्या पुण्याच्या नामांकित जंगली महाराज रस्त्यावरील एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याने किंवा परवडत नसल्याने, चक्क चुलीवर स्वयंपाक बनवून मुलींच्या जेवणाची सोय मेसचालकांकडून केली जात आहे. व्यावसायिक गॅसच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या अडचणींमुळे मेस चालवण्यावर मोठा परिणाम झाला आहे.

एलपीजी उपलब्धतेबाबत काळजी करण्याची गरज नाही.

नालागढ येथील इंडेन गॅस सर्व्हिसचे मालक चंद्रशेखर यांनी सांगितले आहे की, इंडियन ऑइलच्या मजबूत पुरवठा नेटवर्कमुळे, कोणत्याही अडचणीशिवाय त्याच दिवशी सिलिंडर वितरित केले जात आहेत. एका दिवसापेक्षा कमी कालावधीचा बॅकलॉग असल्याने, एलपीजीची कमतरता नाही आणि ग्राहकांना वेळेवर वितरणाची खात्री दिली जात आहे. प्रत्येक घराला एलपीजी सुरळीत आणि विश्वासार्हपणे मिळेल याची खात्री करण्यासाठी इंडियन ऑइलचे वितरक अहोरात्र काम करत आहेत.

Web Title : पुणे में गैस की कमी नहीं, दहशत में बुकिंग चौगुनी हुई।

Web Summary : पुणे में गैस की कमी की आशंका से दहशत, जमाखोरी बढ़ी। अफवाहों से बुकिंग चौगुनी हुई, कमी नहीं। व्यावसायिक गैस की समस्या से मेस में चूल्हे पर खाना बना। आपूर्ति स्थिर, वितरण जारी।

Web Title : No gas shortage in Pune, panic buying quadruples bookings.

Web Summary : Pune citizens are panicking about potential gas shortages, leading to stockpiling. Despite no shortage, bookings quadrupled, fueled by rumors. Commercial gas supply issues impact mess halls forcing wood-fired cooking. Supply is stable, distribution continues uninterrupted.