...तर गॅस कनेक्शन बंद होईल' भीती दाखवून दोघांची तब्बल दीड लाखांची फसवणूक, पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:34 IST2026-04-16T16:34:00+5:302026-04-16T16:34:29+5:30

ज्येष्ठ नागरिकाला फोन करून, तुमच्या गॅसचे बिल भरले नाही, तर ते गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल, अशी भीती दाखवली

...then gas connection will be disconnected', two cheated of Rs 1.5 lakh, incident in Pune | ...तर गॅस कनेक्शन बंद होईल' भीती दाखवून दोघांची तब्बल दीड लाखांची फसवणूक, पुण्यातील घटना

...तर गॅस कनेक्शन बंद होईल' भीती दाखवून दोघांची तब्बल दीड लाखांची फसवणूक, पुण्यातील घटना

पुणे : गॅस बिल भरले नाही, तर गॅस कनेक्शन बंद होईल, अशी भीती दाखवत सायबर चोरांनी दोघांची १ लाख ४४ हजार ६०३ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मार्केटयार्ड आणि नऱ्हे पोलिस ठाण्यात सायबर चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत, सायबर चोरांनी बिबवेवाडी-कोंढवा रोड, मार्केटयार्ड येथील ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फोन करून, तुमच्या गॅसचे बिल भरले नाही, तर ते गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल, अशी भीती दाखवली. तसेच व्हॉट्सअपवर बिल न भरल्याबाबतची नोटीस पाठवली. त्यामध्ये एक लिंक देखील होती. ज्येष्ठ नागरिकाने लिंक क्लिक करून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बँक खात्यातून २९ हजार रुपये डेबिट झाले. ९ एप्रिल रोजी ही घटना घडल्यानंतर ज्येष्ठाने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात जात सायबर चोरांविरोधात फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक नवले करत आहेत. 

दुसऱ्या घटनेत, नऱ्हे, धायरी रोड येथील ४५ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरांनी ९ एप्रिल रोजी गॅस बिल भरण्याचे सांगत एक एपीके फाईल पाठवली. त्यांनी ती लिंक ओपन करताच त्यांच्या बँक खात्यातून १ लाख १५ हजार ५८७ रुपये डेबिट झाले. यानंतर तक्रारदाराने नऱ्हे पोलिस ठाण्यात जात सायबर चोरांविरोधात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस कर्मचारी सोनकांबळे करत आहेत.

Web Title : गैस कनेक्शन की धमकी: पुणे के नागरिकों को ₹1.5 लाख का चूना

Web Summary : पुणे में साइबर ठगों ने गैस बिल के नाम पर दो नागरिकों को ₹1.44 लाख का चूना लगाया। पीड़ितों को धमकी भरे कॉल और नकली नोटिस मिले, जिससे दुर्भावनापूर्ण लिंक पर क्लिक करने के बाद अनधिकृत बैंक कटौती हुई।

Web Title : Gas connection threat: Pune citizens defrauded of ₹1.5 lakh

Web Summary : Cyber thieves in Pune, posing gas bill issues, defrauded two citizens of ₹1.44 lakh. Victims received threatening calls and fake notices, leading to unauthorized bank deductions after clicking malicious links.