शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरूनगरच्या सिद्धेश्वर मंदिरात चोरी : चांदीचे कवच लांबवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 15:22 IST

राजगुरूनगर येथील सिध्देश्वर मंदिराचे दरवाज्याचे कुलुप तोडुन मंदिरारातील गाभाऱ्या मधील शंकराच्या पिडीवरील १५ किलो चांदीचे कवच अज्ञात चोरट्यांनी लांबविलेल्या चांदीच्या कवचाची किंमत सात लाख वीस हजार आहे.

पुणे (राजगुरुनगर) : राजगुरूनगर येथील सिध्देश्वर मंदिराचे दरवाज्याचे कुलुप तोडुन मंदिरारातील गाभाऱ्या मधील शंकराच्या पिडीवरील १५ किलो चांदीचे कवच अज्ञात चोरट्यांनी लांबविलेल्या चांदीच्या कवचाची किंमत सात लाख वीस हजार आहे. चोरटे सी टीव्हीमध्ये कैद झाले असुन पोलिस कसून चौकशी करीत आहेत राजगुरूनगर शहरातील भिमानदीकाठी लगत प्राचिन काळातील हेमाडपंथी असे सिध्देश्वर मंदिर आहे. हे मंदिर राजगुरुनगरमधील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. परिसरात निसर्गरम्य वातावरण असून भाविकांची येथे नेहमी गर्दी असते. (दि. ८ )रोजी सांयकाळी साडेपाच वाजता पुजा व आरती उरकुन रात्री ९.३०वाजता मुख्य दरवाजा बंद करून पुजारी महेश शंकर गुरव  मंदिरालगत असणाऱ्या खोलीत झोपण्यास गेले होते. सकाळी पहाटे साडेपाच वाजता देवाची पुजा आरती करण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला असता असता पिंडीवर चांदीचे कवच नसल्याचे निर्दशनास आले. त्यांनी देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष एकनाथ सांडभोर, महेंद्र मधवे यांना हा चोरीचा प्रकार कळविला..भाविकांनी ६ वर्षापुर्वी सुमारे १५ किलोचे चांदीचे कवच नक्षीकाम करुन मंदिरारातील गाभाऱ्यातील शंकराच्या पिडींवर बसविण्यात आले होते. रात्री २ वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या पुर्वेकडील असलेल्या लोखंडी दरवाज्याचा कोंडा कटवाणीने तोडून अज्ञात दोन चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधुन आतमध्ये प्रवेश केला. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या दरवाजाचे दोन कुलुपे कटावणीने तोडून गाभाऱ्यात गेले गाभाऱ्यामधील चोरी करताना कोणी पाहू नये म्हणून तसेच काही दिसू नये म्हणून चोरट्यांनी मंदिरात टाकलेले लाल कलरचे मॅट चोरट्यांनी मंदिराच्या दर्शनी भागातील दरवाज्यावर टाकले.गाभाराऱ्यातील पिंडीचे कवच १० मिनटांत चोरट्यांनी हाताने काढुन चांदीचे कवच घेऊन तोडलेल्या दरवाज्या वाटे पळून गेले.हा सर्व प्रकार सी सी टीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनास्थळी खेड पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश बडाख यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन पाहणी केली. याबाबत महेश गुरुव यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यापुर्वी मंदिरातील दानपेटी फोडून १० हजार रुपये चोरट्यांनी लांबविले होते.

टॅग्स :RobberyचोरीTempleमंदिरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस