कॅनॉलवर मूर्ती विसर्जित करायला गेलेला आला नाही; नऱ्हेतील अल्पवयीन मुलगा संशयास्पद बेपत्ता, घरासमोर कपडे, मोबाइल सापडल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 10:07 IST2026-04-08T10:06:29+5:302026-04-08T10:07:34+5:30

काही मुलांनी हे साहित्य तिथे आणून टाकल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी याच परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले

The person who went to immerse the idol in the canal did not return; Minor boy missing in canal suspiciously, clothes and mobile found in front of house, causing a stir | कॅनॉलवर मूर्ती विसर्जित करायला गेलेला आला नाही; नऱ्हेतील अल्पवयीन मुलगा संशयास्पद बेपत्ता, घरासमोर कपडे, मोबाइल सापडल्याने खळबळ

कॅनॉलवर मूर्ती विसर्जित करायला गेलेला आला नाही; नऱ्हेतील अल्पवयीन मुलगा संशयास्पद बेपत्ता, घरासमोर कपडे, मोबाइल सापडल्याने खळबळ

पुणे : नऱ्हे परिसरातील एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा सोमवारपासून संशयास्पदरीत्या बेपत्ता झाला आहे. श्रीश प्रदीप धेंडे (वय १४, रा.वृंदावन सृष्टी, नऱ्हे-वडगाव रस्ता) असे या मुलाचे नाव असून, मंगळवारी सकाळी त्याचे कपडे आणि मोबाइल काही मुलांनी त्याच्या सोसायटीसमोर आणून टाकल्याने या प्रकरणातील गूढ अधिक वाढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीश सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरातील लक्ष्मीची भंगलेली मूर्ती विसर्जित करण्यासाठी धायरी फाट्याजवळील कॅनॉलवर गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत परिसरातील इतर दोन-तीन मुलेही होती. मात्र, मूर्ती सोमवारी रात्रीपर्यंत कॅनॉलमध्ये सापडली. श्रीश रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्याच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. श्रीशचे कपडे आणि त्याचा मोबाइल त्याच्या राहत्या सोसायटीसमोरच सापडले. काही मुलांनी हे साहित्य तिथे आणून टाकल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी याच परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मंगळवारी नऱ्हे पोलिस ठाण्यातून हा गुन्हा नांदेड सिटी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. हा मुलगा कोणास आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले.

Web Title : पुणे: मूर्ति विसर्जन के बाद लड़का लापता, घर के पास कपड़े मिले

Web Summary : पुणे के नन्हे इलाके से एक 14 वर्षीय लड़का सोमवार से लापता है। वह मूर्ति विसर्जित करने गया था। उसके कपड़े और मोबाइल उसके घर के पास मिले हैं, जिससे रहस्य गहरा गया है। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Pune: Boy Missing After Idol Immersion, Clothes Found Near Home

Web Summary : A 14-year-old boy from Narhe, Pune, is missing since Monday after going to immerse an idol. His clothes and mobile were found near his society, deepening the mystery. Police are investigating the suspicious disappearance.