शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच ल्होत्से शिखर केले पादाक्रांत; महाराष्ट्रातील एकमेव पोलीस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:40 IST

ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत विरळ असल्याने साधे चालतानाही गिर्यारोहकांची दमछाक होते, परंतु जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्स यामध्ये यशस्वी होतात

लोणी काळभोर : जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच असलेले माऊंट ल्होत्से शिखर मूळचे सोलापूर व कर्मभूमी लोणी काळभोरचे सुपुत्र सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे सर करून महाराष्ट्र पोलीस दल व लोणी काळभोरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यापूर्वी ही त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट शिखर(८८४८ मीटर) त्यानंतर माऊंट मकालू शिखर (८४८४ मीटर)त्यानंतर माउंट मनासलू शिखर (८१६३ मीटर)व आता जगातील चौथ्या क्रमांकाचे ल्होत्से शिखर(८५१६ मीटर) त्यांनी सर केले.

सध्या ते नागपूर शहर गुन्हे शाखा येथे कार्यरत आहेत. यावेळी बोलताना ननवरे म्हणाले, अत्यंत खराब वातावरण असताना सुद्धा चाळीस दिवस नेपाळ येथे तळ ठोकून जिद्द व चिकाटीच्या जोरावर नियमित खडतर सराव करून आपले कर्तव्य बजावून शिखर यशस्वीरित्या सर केले. अति उंच ठिकाणामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत विरळ असते. त्यामुळे साधे चालतानाही गिर्यारोहकांची दमछाक होते. परंतु जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्स यामध्ये यशस्वी होतात. ल्होत्से शिखर चढाई अत्यंत खडतर असून जगातील चौथ्या क्रमांकाचे कठीण शिखर आहे. या मोहिमेसाठी त्यांना एव्हरेस्ट वीर भगवान चवले व एव्हरेस्ट वीर पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच नेपाळमधील पायोनियर एडवेंचरचे निवेश कारकी व मिंग दोरजी शेर्पा यांनी मोलाची मदत केली. माझे शिखर सर केलेले यश हे ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेले जवान व पहलगामा हल्ल्यात मृत्यू पडले नागरिक यांना समर्पित करतो. 

शिवाजी ननवरे हे आठ हजार मीटर उंचीपेक्षा जास्त उंचीची ४ शिखरे सर करणारे देशातील तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील एकमेव आणि पहिले पोलीस अधिकारी आहेत. यासाठी त्यांना नागपूर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर सहाय्यक पोलिस आयुक्त अभिजीत पाटील तसेच नागपूर शहर सामाजिक सुरक्षा विभाग येथील सर्वांनी मोलाचे मार्गदर्शन व मदत केली सोलापूर जिल्ह्याला आणि पोलीस खात्याला त्यांचा सार्थ अभिमान आहे.त्यांच्या यशाबद्दल लोणीकाळभोर गावातील ग्रामस्थ तसेच त्यांचे पुणे पोलीस दलातील सहकारी मित्र यांनी अभिनंदन केले.

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरTrekkingट्रेकिंगEverestएव्हरेस्टPoliceपोलिसnagpurनागपूर