मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पामुळे लोणावळा परिसरात होणार बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:08 IST2026-04-21T15:08:02+5:302026-04-21T15:08:26+5:30

सध्या खोपोली-लोणावळा घाट विभागात वळणावळणाचे रस्ते, चढ-उतार आणि वारंवार होणारी वाहतूककोंडी ही मोठी समस्या आहे.

The Missing Link project will bring changes to the Lonavala area. | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पामुळे लोणावळा परिसरात होणार बदल

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पामुळे लोणावळा परिसरात होणार बदल

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून 'मिसिंग लिंक' प्रकल्प हा खोपोली ते कुसगाव दरम्यान १३.३ किमीचा एक महत्त्वाकांक्षी बायपास प्रकल्प आहे. सुमारे ६,६९५ कोटींचा हा प्रकल्प १ मे २०२६ पासून वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ सुमारे २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या खोपोली-लोणावळा घाट विभागात वळणावळणाचे रस्ते, चढ-उतार आणि वारंवार होणारी वाहतूककोंडी ही मोठी समस्या आहे. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे या घाटातील धोकादायक व वेळखाऊ टप्पा बायपास होणार असून, वाहनचालकांना अधिक सरळ व जलद मार्ग उपलब्ध होईल.

या प्रकल्पात बोगदे आणि उंच पूल यांचा समावेश आहे. पावसाळ्यात दरडी कोसळणे, धुके आणि अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होईल. मात्र, या बदलांचा स्थानिक पातळीवर काही परिणामही होऊ शकतो. घाटातील पारंपरिक थांबे, छोटे हॉटेल्स व दुकानदार यांचा व्यवसाय कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; कारण अनेक वाहने नवीन मार्गाचा वापर करतील.

मिसिंग लिंक सुरू झाल्यावर स्थानिकांना काय फायदा?

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प सुरू झाल्यानंतर केवळ प्रवाशांनाच नव्हेतर, लोणावळा परिसरातील स्थानिक नागरिकांनाही अनेक प्रकारे फायदा होणार आहे. सर्वांत मोठा फायदा म्हणजे वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर जड वाहतूक घाटातून वळवली जाईल, त्यामुळे स्थानिक रस्त्यांवरील गर्दी कमी होईल. प्रदूषणात घट हा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे. वाहतूककोंडी कमी झाल्यामुळे धूर, आवाज आणि पर्यावरणीय प्रदूषणात घट होईल, ज्याचा थेट फायदा स्थानिकांच्या आरोग्यावर होईल. 

मिसिंग लिंक प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये :

एकूण लांबी : १३.३ किलोमीटर, ज्यामध्ये ६ किमीचा बोगदा आणि पूल आणि ७.३ किमीचा रस्ता समाविष्ट.

दोन जुळे बोगदे : ८.८७ किमी आणि १.६८ किमी लांबीचे दोन मोठे बोगदे, जे आशियातील सर्वांत रुंद बोगद्यांपैकी एक आहेत. केबल-स्टेड पूल ६५० मीटर लांबीचा एक केबल-स्टेड पूल. ज्याचे खांब १८२ मीटर उंच आहेत.

कमी होणारं अंतर : हा प्रकल्प ६ किमी अंतर कमी करेल.

Web Title : मिसिंग लिंक परियोजना से लोनावाला क्षेत्र में बदलाव: मुख्य बातें

Web Summary : मुंबई-पुणे मिसिंग लिंक परियोजना, 13.3 किमी का बाईपास, जल्द ही पूरा होने वाला है। इससे यात्रा का समय 25-30 मिनट कम हो जाएगा। यातायात और प्रदूषण कम होने के साथ-साथ, कुछ स्थानीय व्यवसाय प्रभावित हो सकते हैं। मई 2026 तक पूरा होने की उम्मीद है।

Web Title : Missing Link Project to Transform Lonavala Area: Key Changes

Web Summary : The Mumbai-Pune Missing Link project, a 13.3 km bypass, is nearing completion. It will reduce travel time by 25-30 minutes. While easing traffic and pollution, some local businesses may be affected. Completion is expected by May 2026.