पुणे: सूर्य आग ओकत असून, अंगाची लाही लाही करणाऱ्या असह्य उकाड्याने पुणेकर घामाघूम झाले आहेत. मंगळवारी (दि.१४) उपनगरांमध्ये तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडल्याचे पाहायला मिळाले. लोहगावमध्ये सर्वाधिक ४१.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली. पुढील दोन दिवसात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
निरभ्र आकाश आणि कमाल तापमानातील वाढ यामुळे शहरात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पुण्यातील कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते आणि महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत जातो. मात्र दोन दिवसांपूर्वीच तापमानाचा पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहचला होता. आता तर खडकवासला, वारजे, कात्रज, कोरेगाव् पार्क या भागात तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने पुणेकरांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोप्या, छत्रीचा वापर केला जात असून, थंडगार पेय घेण्यासाठी पुणेकरांची पावले शीतपेयांच्या दुकानांकडे वळत आहेत.
पुण्यातील इतर भागातील कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअस) : शिवाजीनगर (३९.९), लोहगाव (४१.८), खडकवासला (४०.२), कोरेगाव पार्क ( ४०.४) डेक्कन (४१) , कोरेगाव पार्क
Web Summary : Pune experiences scorching heat, with temperatures exceeding 40°C in several areas. Lohgaon recorded 41.8°C. The weather department forecasts a further rise of 2-3°C in the next two days, prompting residents to seek cool drinks and shade.
Web Summary : पुणे में भीषण गर्मी, कई इलाकों में तापमान 40 डिग्री सेल्सियस से ऊपर। लोहगांव में 41.8 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया। मौसम विभाग ने अगले दो दिनों में 2-3 डिग्री सेल्सियस की और वृद्धि का अनुमान जताया है, जिससे निवासियों को ठंडे पेय और छाया की तलाश है।