‘टेमघर’ करणार डिसेंबरपर्यंत रिकामे ; दुसऱ्या टप्प्यातील कामास जानेवारी-२०२० पासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 11:52 AM2019-11-13T11:52:01+5:302019-11-13T11:55:39+5:30

धरणाच्या दुरुस्तीचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केल्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात दोन वर्षांनी धरणात शंभर टक्के (३.७१ टीएमसी) पाणीसाठा करण्यात आला आहे...

'Temghar' will be empty in the December | ‘टेमघर’ करणार डिसेंबरपर्यंत रिकामे ; दुसऱ्या टप्प्यातील कामास जानेवारी-२०२० पासून सुरुवात

‘टेमघर’ करणार डिसेंबरपर्यंत रिकामे ; दुसऱ्या टप्प्यातील कामास जानेवारी-२०२० पासून सुरुवात

Next
ठळक मुद्देदुसऱ्या टप्प्याचे काम जानेवारीपासून : काम पूर्ण होण्यास लागणार वर्षअवघ्या १५ वर्षांमधेच धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे दोन वर्षांपूर्वी समोर

पुणे : टेमधर धरणाला मजबुती देण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामास जानेवारी-२०२० पासून सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होण्यास वर्षभराचा कालावधी लागेल, असे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या कामासाठी ५० कोटी रुपये मंजूर असून, त्यापैकी ३८ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. 
 मुळशी तालुक्यातील मुठा नदीवर हे धरण बांधण्यात आले असून, २००१ सालापासून त्यात पाणी साठविले जात आहे. अवघ्या १५ वर्षांमधेच धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे दोन वर्षांपूर्वी समोर आले. धरणाला धोका पोहचतो की, काय असाही प्रश्न उपस्थित केला होता. 
धरणाच्या दुरुस्तीचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केल्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात दोन वर्षांनी धरणात शंभर टक्के (३.७१ टीएमसी) पाणीसाठा करण्यात आला आहे. येत्या डिसेंबर अखेरीपर्यंत धरण पूर्ण रिकामे करण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु होईल. सध्या धरणात २.७१ टीएमसी (७३.१९ टक्के) पाणीसाठा आहे. 
ग्राऊटिंग (भेगा बुजविणे) व पॉलिफायबर रिइन्फोर्स शॉटक्रिट या तंत्राच्या आधारे भेगा बुजविणे आणि धरणाला मजबुती देण्याचे काम करण्यात येत आहे. यातील भेगा बुजविण्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून, पॉलिफायबर तंत्रज्ञानाने करण्यात येणारे मजबुतीचे काम १० टक्के झाले आहे. दुरुस्तीचे काम होण्यापूर्वी टेमघर धरणामधून सेकंदाला तब्बल अडीच हजार लिटर पाण्याची गळती होत होती. धरणाचा प्रकार, लांबी, उंची व पाणी साठविण्याची क्षमता या नुसार गळतीचे सामान्य प्रमाण किती असते, हे ठरविले जाते. 
यानुसार टेमघरमधे ७५ लिटर प्रतिसेकंद पाण्याची गळती, सामान्य ठरते, त्यापेक्षा ही गळती कितीतरीपट अधिक होती. 
...
धरणातील गळतीचे प्रमाण खाली आले पहिल्या टप्प्यात केलेल्या कामामुळे धरणातील गळतीचे प्रमाण अडीचशे लिटर प्रतिसेकंदपर्यंत खाली आली आहे. उर्वरीत काम झाल्यानंतर गळती संपूर्ण आटोक्यात येईल. 
........
पावसाळ्याचे दिवस वगळून काम सुरू राहील. संपूर्ण काम पूर्ण होण्यास डिसेंबर-२०२० उजाडेल, अशी माहिती जलसंपदा अधिकाऱ्यांनी दिली.  

Web Title: 'Temghar' will be empty in the December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.