शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट डुकरांना पकडण्यासाठी पुणे शहरात आली ‘टीम ढोणी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 13:29 IST

पहिला दिवस : २७ डुकरं पकडली

ठळक मुद्देशहरात मोकाट डुकरांचा त्रासात वाढ

पुणे : शहरातील मोकाट डुकरांना आवर घालण्याकरिता पालिकेच्या मदतीला ‘टीम ढोणी’ धावून आली आहे. कर्नाटकमधून दहा ते बारा जणांचे मनुष्यबळ मागविले असून दुर्गाप्पा ढोणी यांना हे काम दिले आहे. ढोणी यांच्या पथकाने शहरात विविध ठिकाणी फिरुन मंगळवारी दिवसभरात २७ डुकरं पकडली. शहरात मोकाट डुकरांचा त्रास वाढत चालला आहे. दुर्गंधी व अस्वच्छतेमध्ये त्यामुळे भर पडत चालली आहे. पालिकेच्या मुख्य सभेमध्ये यावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाला धारेवर धरले होते. या व्यवसायात असलेले बहुतांश जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे पालिकेने राबविलेली डुक्करमुक्त शहराची मोहीम अनेकदा हाणून पाडली. पालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर निवेदन देत मोकाट डुकरांवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. ५८ डुक्कर व्यावसायिकांना नोटिसा दिल्या होत्या. दरम्यान, कर्नाटकचे दुर्गाप्पा ढोणी व तमिळनाडूचे मे. आर. राजकुमार यांच्याकडून पालिकेला पत्रव्यवहार करीत मोफत डुक्कर पकडून देण्याचे आश्वासन दिले होते. पालिकेने यातील दुर्गाप्पा ढोणी यांच्या संस्थेला शहरातील डुकरे पकडण्याचे काम सोपविले आहे. ढोणी हे काम नि:शुल्क करणार असून पकडलेली जनावरे ते घेऊन जाणार आहेत.  .......ढोणी यांची दहा ते बारा जणांची टीम आहे. आठवड्यातून दोन वेळा हे काम केले जाणार आहे. डुक्कर पकडताना गरोदर व लहान पिले पकडली जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यांनी यापूर्वी नागपूर व सोलापूर येथे पालिकांसाठी काम केले आहे. नागपूर महापालिकेसाठी काम करीत असतानाच त्यांनी पुणे पालिकेला पत्र पाठविले होते. त्यानुसार, ढोणी यांना काम दिले आहे. पकडलेली डुकरे ते घेऊन जाणार आहेत. बिबवेवाडी, वडगाव शेरी, येरवडा, नागपूर चाळ, हडपसर, कोंढवा, वारजे, कात्रज, सिंहगड रस्ता आदी उपनगरांमध्ये मोकाट डुकरांचा त्रास अधिक आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय वगळता अन्य सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हा त्रास आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका