स्वारगेट शिवशाही प्रकरणातील नराधमाचा फोटो समोर; आरोपीवर पुण्यासह शिरूरमध्ये चोरी, हाणामारीचे गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:39 IST2025-02-26T15:07:18+5:302025-02-26T15:39:02+5:30

Pune Rape Accused: नराधम दत्तात्रय गाडे फरार असून पुणे पोलिसांची ८ पथके त्याचा शोध घेत आहेत

Swargate Shivshahi case photo in front Crimes of theft mayhem in Pune and Shirur against the rape accused | स्वारगेट शिवशाही प्रकरणातील नराधमाचा फोटो समोर; आरोपीवर पुण्यासह शिरूरमध्ये चोरी, हाणामारीचे गुन्हे

स्वारगेट शिवशाही प्रकरणातील नराधमाचा फोटो समोर; आरोपीवर पुण्यासह शिरूरमध्ये चोरी, हाणामारीचे गुन्हे

Pune Rape Case: स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपीचा फोटो समोर आला आहे. दत्तात्रय रामदास गाडे असे त्या नराधमाचे नाव आहे. 

 पुणेपोलिसांचे पथक आरोपी दत्तात्रय गाडेच्या घरी दाखल झाले आहे. मात्र गाडे घरी नसून तो फरार आहे. पुणेपोलिसांकडून आरोपी खाडे याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. गाडे याच्यावर पुण्यासह शिरूर मध्ये सुद्धा चोरी, हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं सुद्धा गाडेचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या आठ पथकांडून आरोपीचा शोध सुरु आहे.   

 तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करत होती. स्वारगेट एसटी स्टँड येथे थांबल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. मात्र, तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. यादरम्यान आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले आणि जवळ उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला. बस बंद असल्याचे लक्षात आल्यानंतरही आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले आणि स्वतःही बसमध्ये घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि लगेचच तिथून फरार झाला.   

तरुणीने मित्राला फोनवर सांगितला प्रकार  

या धक्कादायक घटनेनंतर तरुणी फलटणला जाण्यासाठी बसमध्ये बसली होती. बसमध्ये बसल्यानंतर तिने आपल्या मित्राला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला. मित्राने तिला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला, यानंतर तिने स्वारगेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.  

Web Title: Swargate Shivshahi case photo in front Crimes of theft mayhem in Pune and Shirur against the rape accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.