एकच किडनी असलेल्या तीन वर्षांच्या कुत्र्यावर शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:13 IST2021-09-04T04:13:52+5:302021-09-04T04:13:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रॉली या ३ वर्षांच्या कुत्र्याला गेल्या वर्षापासून हर्नियाचा त्रास आहे. गेल्या ३ महिन्यांपासून त्याच्यावर ...

Surgery on a three-year-old dog with a single kidney | एकच किडनी असलेल्या तीन वर्षांच्या कुत्र्यावर शस्त्रक्रिया

एकच किडनी असलेल्या तीन वर्षांच्या कुत्र्यावर शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रॉली या ३ वर्षांच्या कुत्र्याला गेल्या वर्षापासून हर्नियाचा त्रास आहे. गेल्या ३ महिन्यांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जन्मत: एकच किडनी असलेल्या रॉलीला अलीकडेच हर्नियाचे निदान झाले. डॉक्टरांच्या सल्ल्याने जन्मत:च एक किडनी असलेल्या रॉलीवर दुर्मीळ लेप्रोस्कोपिक हर्निक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. अशा पध्दतीच्या शस्त्रक्रियेची ही भारतातील पहिलीच घटना आहे.

रॉलीला उलटी होणे, अतिसार, पाठीत कळ येणे, ओटीपोटात दुखणे, श्वास घेण्यात अडचण येणे आणि सतत लाळ गळणे अशी लक्षणे दिसून येत होती. त्याला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात आणण्यात आले. गॅस्ट्रोस्कोपी, सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचण्या केल्यानंतर रोगाचे निदान झाले. हार्मोनिक स्केलपेल, लेप्रोस्कोपिक सेट आणि लिव्हर रीट्रॅक्टर यासारख्या विविध प्रकारच्या साधनांच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर रॉली लवकरच बरा झाला.

शस्त्रक्रियेनंतर रॉली १५ दिवस द्रव आहाराचे सेवन करत असल्याची माहिती डॉ. नरेंद्र परदेशी यांनी दिली. डॉ. परदेशी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. शशांक शाह यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांच्यासोबत डॉ. ज्योती परदेशी, सुधींद्र हरीभत, रीना हरिभत, ऋतुजा काकडे, शिल्पा पुजारी हे कार्यरत होते.

चौकट

“शस्त्रक्रियेनंतर रॉली आता मुक्तपणे फिरू शकतो. आम्हाला पाळीव प्राण्याचे देखील चांगले पालक नक्कीच होता येते, याची जाणीव या शस्त्रक्रियेने करून दिली. प्राण्यांनाही मनुष्यांसारखाच आजार किंवा वेदना होतात, परंतु आपल्यासारखे ते व्यक्त करू शकत नाहीत. म्हणूनच पशुवैद्यकांकडून त्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.”

-दिनेश कथुरिया, रॉलीचे पालक

Web Title: Surgery on a three-year-old dog with a single kidney