शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखाने, महिला बचत गटांना मिळणार वीज बिल वसुलीचे अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 02:47 IST

सहकारी संस्थांना थकबाकीच्या ३० टक्के कमावण्याची संधी.

विशाल शिर्के पिंपरी :  कृषी वीज बिल वसुलीचे अधिकार ग्रामपंचायतींसह सहकारी साखर कारखाना, सहकारी सूत गिरणी, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि महिला बचत गटांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यापोटी प्रति बिल पाच रुपये ते थकबाकीच्या ३० टक्के रक्कम मिळविण्याची संधी या संस्थांना मिळणार आहे.कृषी आणि इतर वीज बिल थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याने महावितरणने काही धोरणात्मक बदल केले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील बिल वसुलीसाठी ग्रामपंचायतींना नेमण्याचे पाऊल महावितरणने उचलले. त्या पुढे जात महिला बचत गट आणि सहकारी संस्थांनादेखील बिल वसुलीचे अधिकार देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतींना कृषी आणि इतर सर्व प्रकारच्या वीज बिल वसुलीचे अधिकार देण्यात आले आहेत. उर्वरित संस्थांना केवळ कृषी वीज बिल वसुलीचे अधिकार असतील. या संस्थांना प्रति पावतीमागे पाच रुपये दिले जातील. 

अशी होईल संस्थांची नोंदणी -- महावितरणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मदतीने वेब पोर्टलद्वारे नोंदणी होणार.- संस्थांना संगणकीय प्रणालीद्वारे कलेक्शन सेंटर कोड मिळणार.- ग्रामपंचायत वगळता इतर संस्थांना बिल भरणा केंद्र मंजुरीनंतर महापॉवर पे या वॉलेटद्वारे कृषी ग्राहकांचा बिल भरणा करता येईल.- सरपंच, ग्रामसेवक, संचालक यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड या माध्यमातून ग्रामपंचायत नोंदणीकृत होणार.- सरासरी वीज बिल भरण्याच्या तीन दिवसाइतकी रक्कम अनामत म्हणून घेणार, अनामत रक्कम दरमहा सुधारित केली जाणार.

इतका मिळेल मोबदला  -- प्रति वीज बिल पावतीमागे ५ रुपये.- शेतकरी सहकारी संस्था व साखर कारखान्यांनी वसूल केलेल्या कृषी थकबाकी रकमेवर १० टक्के प्रोत्साहन रक्कम.- उर्वरित संस्थांनी कृषी थकबाकी स्वीकारल्यास भरणा केलेल्या रकमेच्या ३० टक्के आणि चालू कृषी वीज बिलाचा भरणा केल्यास २० टक्के प्रोत्साहन मोबदला मिळेल.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजgram panchayatग्राम पंचायत