शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: अचानक वर्गात घुसला; दप्तरातून कोयता काढत थेट दहावीच्या विद्यार्थ्यावर हल्ला, परीक्षा केंद्रावर गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 15:32 IST

Koyta Gang Attack: संबंधित विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखून हातावर वार झेलत स्वतःचा बचाव केल्याने जीव वाचला

ओतूर (जुन्नर) : येथील चैतन्य विद्यालयातील १६ वर्षीय विद्यार्थ्यावर एका १७ वर्षीय अनोळखी अल्पवयीन मुलाने ओतूर परीक्षा केंद्रावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. सुदैवाने विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखत हातावर वार झेलून स्वतःचा बचाव केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, ओतूर येथील चैतन्य विद्यालयातील विद्यार्थी गाडगे महाराज परिसरातील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर देण्यासाठी परीक्षेसाठी गेला होता. त्यावेळी एक १७ वर्षीय अनोळखी अल्पवयीन मुलगा अचानक वर्गात घुसला. त्याने आपल्या दप्तरातून कोयता काढत संबंधित विद्यार्थ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र संबंधित विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखून हातावर वार झेलत स्वतःचा बचाव केला. त्यामुळे त्याचा जीव वाचला असून त्याच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.    या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात हल्ला करणारा आणि जखमी झालेला अल्पवयीन तरुण असल्याची माहिती समोर आली असून पुढील तपास ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

नंबरप्रमाणे आम्ही काम करत होतो. त्यावेळी अचानक गोंधळाचा आवाज झाला. आम्ही तात्काळ धाव घेत विद्यार्थ्यांची सुटका केली. संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. हल्ला झालेल्या विद्यार्थ्याला रायटर देण्यात आला व त्याने इतिहासाचा पेपर पूर्ण केला आहे.-  संपत माने, केंद्र प्रमुख

टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याJunnarजुन्नरssc examदहावीStudentविद्यार्थीEducationशिक्षणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे