शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई

By admin | Updated: August 3, 2015 04:23 IST

पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत, अशा गावांसह प्रामुख्याने नीरा

नीरा : पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत, अशा गावांसह प्रामुख्याने नीरा शहरातील निवडणूकीतील उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्यास तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी बोलताना दिला.पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या प्रचाराची सांगता रविवारी संध्याकाळी झाली. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. जय जाधव यांनी पुणे जिल्ह्यात अधिक प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. नीरा शहरात देखील निवडणूकीच्या पाश्वर्भूमीवर बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा दाखल झाला आहे. जेजुरीचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाच्या आणि होमगार्डच्या तुकड्यांनी नीरा शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन केले. नीरा शहरातील प्रमुख मार्गावरून करण्यात आलेल्या संचलनामध्ये पोलीस निरीक्षक रामदास शेळके, नीरा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव, पोलीस उपनिरीक्षक रमेश वायकर, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल भालेराव यांच्यासह ३५ पोलीस कमर्चारी, ५ महिला पोलीस कमर्चारी, २० होमगार्ड, ९ महिला होमगार्ड सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतराच्या आत उमेदवार अगर त्यांचे प्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी मतदारांना प्रलोभन देणे , दहशत निर्माण करणे किंवा संशयास्पद हालचाली केल्यास संबंधितांवर पोलीस कडक कारवाई करणार आहे, असा इशारा देत उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आचार संहितेचे काटेकोर पालन करून निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी केले आहे. दरम्यान, नीरेतील सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी चव्हाण गट या दोन्ही गटांच्या प्रचाराची सांगता सभा रविवारी संध्याकाळी झाली.