शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यासह राज्यातील परिवहन संवर्गगातील वाहनाचे थांबले पासिंग; 'रिफ्लेक्टर'चा मोठा तुटवडा निर्माण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 22:27 IST

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात रिफ्लेक्टरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून त्याचे भाव वाढविण्यात आहे.

पुणे : परिवहन संवर्गगातील प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या पाठीमागे रिफ्लेक्टर, रिफ्लेक्टिव टेप , रियर मार्किंग टेप, बसवणे बंधनकारक आहे.मात्र ते बसविले नसल्याने पुण्यासह राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयातील वाहनाचे पासिंग रोखण्यात आले आहे. त्यामुळे वाहन चालक चिंताक्रांत बनले आहेत. 

राज्यात रिफ्लेक्टरचा पुरवठा करणाऱ्या तीन पैकी एका कंपनीने प्रमाणपत्र सादर न केल्याने त्याला उत्पादनास मनाई करण्यात आली आहे.तर उर्वरित दोन कंपन्यांनी रिफ्लेक्टरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला असल्याचे बोलले जात आहे.शिवाय रिफ्लेक्टरच्या किंमतीत ही मोठी वाढ करण्यात झाली आहे. लॉकडाऊननंतर आयुष्य कसेबसे सुरू होत असताना आता पुन्हा अशा बाबींचा फटका वाहन चालकांना बसत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी वाहनचालक करीत आहे........गेल्या तीन दिवसांपासून राज्यात रिफ्लेक्टरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून त्याचे भाव वाढविण्यात आहे. रिफ्लेक्टर नाही म्हणून पुण्यासह राज्यात प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनाचे पासिंग झालेले नाही. परिवहन आयुक्तांनी याची तात्काळ दखल घ्यावी.बापू भावे, खजिनदार, पुणे शहर रिक्षा फेडरेशन, पुणे.  ....रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातना आळा बसावा म्हणून वाहनाच्या पाठीमागे रिफ्लेक्टर बसविणे अनिवार्य केले. मात्र याचा तुटवडा निर्माण झाला आहे का याची माहिती नाही.तुटवडा दूर करण्यासाठी जर अन्य काही कंपन्यांनी परवानगी मागितली तर त्यांना देखील परवानगी देऊ.  डॉ अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त, मुंबई.

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसfour wheelerफोर व्हीलरMaharashtraमहाराष्ट्र