शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बारसू रिफायनरीविरोधात आता राज्यव्यापी लढा, दोन समित्यांची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 09:50 IST

बारसू रिफायनरीविरोधात स्थानिक पातळीवर लढा सुरू आहे. त्या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप देण्यासाठी बैठक झाली. 

पुणे : विनाशकारी रिफायनरी प्रकल्पामुळे बारसू येथील जैवविविधतेवर दूरगामी परिणाम होणार आहे. यामुळे पुण्यात राज्यभरातील कार्यकर्त्यांना, विविध पुरोगामी संघटनांना, डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना बोलावून बैठक घेण्यात आली. याविरोधात राज्यव्यापी लढा देण्यासाठी दोन समित्या गठित केल्या आहेत. यानुसार आम्ही लढा देणार आहोत, अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.

बारसू रिफायनरीविरोधात स्थानिक पातळीवर लढा सुरू आहे. त्या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप देण्यासाठी बैठक झाली. पाटणकर म्हणाले, परदेशात असे विनाशकारी प्रकल्प केले जात नाहीत. आपल्याला इंधन, ऊर्जा हवी आहे. पण त्याबदल्यात निसर्गाचे नुकसान नकोय. बारसू येथे जैवविविधता संपन्न असा प्रदेश आहे. तिथे कास पठारपेक्षा सुंदर कातळशिल्प, सडे आहेत. त्यांचे महत्त्व खूप आहे. ते सर्व या प्रकल्पामुळे नष्ट होतील. हा लढा राज्यव्यापी करण्यासाठी एक राज्यस्तरीय बारसू रिफायनरीविरोधी लढा समिती आणि अभ्यास-संशोधन समिती गठित केल्या आहेत. येत्या १७ जून रोजी मुंबईत दोन्ही समितींच्या बैठका होतील. त्यातून पुढील लढा ठरविण्यात येईल.

विनाशकारी प्रकल्पाऐवजी पर्यावरणपूरक, रिन्यूएबल एनर्जी करण्यासाठी आम्ही काही पर्याय सरकारला देत आहोत. ते राबवा आणि इंधन, ऊर्जा तयार करावी. निसर्गाची हानी करू नये. हा केवळ विरोधाचा लढा नाही, तर वैज्ञानिकतेचा आहे.डॉ. भारत पाटणकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Barsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पkonkanकोकणPuneपुणे