शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारचे व्यवस्थेकडे दुर्लक्ष; पोलिसांची सुरक्षा धोक्यात आल्याने चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 19:03 IST

पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही

पिंपरी : जे पोलीस आपली काळजी घेतात त्यांचीच सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. पोलिसांवरील हल्ले लज्जास्पद बाब असून ही शोभा देणारी गोष्ट नाही. यापुढे पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई रवींद्र करवंदे हे वाहतूक नियमन करीत असताना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यात करवंदे गंभीर जखमी झाले. त्यामुळे करवंदे यांची दरेकर यांनी सोमवारी कासारवाडी येथे खासगी रुग्णालयात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

प्रवीण दरेकर म्हणाले, जखमी पोलीस करवंदे यांच्या तब्बेतीची चाैकशी केली. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. राज्यात पोलिसांवर हल्ले होत आहेत. असा एक दिवस नाही की राज्यात पोलिसांवर हल्ला झाला नाही. पोलिसांच्याच सुरक्षेची चिंता असेल तर त्यांची सुरक्षा करा, अशी कोणाकडे मागणी करायची? ही सरकारची जबाबदारी आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राज्य सरकारने व्यवस्थेवर नीट लक्ष ठेवत समाजातील अशा प्रवृत्तीच्या लोकांची पुन्हा अशी हिम्मत होणार नाही, यासाठी ही प्रवृत्ती मुळासकट ठेचली पाहिजे. पूर्वी हाफ पॅन्टवरील पोलीस एक दंडुका घेऊन आले तरी गाव शांत व्हायचं. आज ते कमी होताना दिसतंय. सरकारचे, प्रशासनाचे, व्यवस्थेकडे लक्ष नाही. त्यांनी लक्ष द्यावे. 

‘प्रभुणे यांचा सन्मान राखला जाईल’पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले चिंचवड येथील गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला महापालिकेने नोटीस बजावली आहे. मिळकत कर थकविल्याप्रकरणी ही नोटीस आहे. मात्र नोटिशीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. त्याबाबत दरेकर म्हणाले, सत्तेत असलेले महापाैर, सभागृह नेता किंवा स्थायी समितीचा अध्यक्ष नोटीस पाठवित नाहीत. प्रशासन किंवा संबंधित विभागाकडून नोटीस बजावली जाते. त्यांच्याशी सत्ताधाऱ्यांचा संबंध नसतो. तरीही पुरस्कारप्राप्त व्यक्तींना नोटीस पाठविली असेल तर महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी याची दखल घेतील. नोटीस का पाठविली याची विचारणा करून पुरस्कार्थींचा सन्मान राखला जाईल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसPraveen Darekarप्रवीण दरेकरState Governmentराज्य सरकार