शिरुर बस स्थानकात सुरक्षितता मोहिमेची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:10 IST2021-01-21T04:10:20+5:302021-01-21T04:10:20+5:30

शिरुर बस स्थानकात सुरक्षितता मोहिमेची सुरुवात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रा.चंद्रकांत धापटे यांच्या हस्ते करण्यात आली. ...

Start of security operation at Shirur bus stand | शिरुर बस स्थानकात सुरक्षितता मोहिमेची सुरुवात

शिरुर बस स्थानकात सुरक्षितता मोहिमेची सुरुवात

शिरुर बस स्थानकात सुरक्षितता मोहिमेची सुरुवात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रा.चंद्रकांत धापटे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उद्योजक वाय. डी. गायकवाड, सहायक कार्यशाळा अधीक्षक सुयश शिर्के, सहायक वाहतूक अधीक्षक आयेशा शेख, ईरशाद मणियार आदी उपस्थित होते.

धापटे म्हणाले की, सध्याच्या दगदगीचा काळात शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे. शारीरिक व मानसिक आरोग्यही जपले पाहिजे. आज ही सुरक्षित वाहन व प्रवासासाठी एसटीला प्राधान्य दिले जाते. इंधन बचतीबरोबर प्रवाशी वाढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा धापटे यांनी व्यक्त केली. लॉकडाऊनचा काळात वाहने रस्त्यावर नसल्याने अपघाताचे प्रमाण खूप कमी झाले होते. एसटीचा प्रवास सुरक्षित व निर्धोक होण्यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करावेत.

शिरुर बस डेपोतील चालक-वाहक व कर्मचारी यांच्या समुपदेशनासाठी बोरा महाविद्यालयाचा वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे धापटे यानी सांगितले.

प्रास्ताविक आगार व्यवस्थापक महेंद्र माघाडे यानी केले.

सूत्रसंचालन शिवशंकर पोटे यांनी केले तर आभार वरिष्ठ लिपिक मनोज कुलकर्णी यानी मानले.

शिरुर बस स्थानकात सुरक्षितता मोहीम कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रा.चंद्रकांत धापटे.

Web Title: Start of security operation at Shirur bus stand