शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

सॉरी सरोदे मावशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:11 IST

बेड न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिक महिलेचे घरीच निधन लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वय वर्षे ७७़ मधुमेह, रक्तदाबाचा ...

बेड न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिक महिलेचे घरीच निधन

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वय वर्षे ७७़ मधुमेह, रक्तदाबाचा त्रास, एक हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला. अशा महिलेला कोरोनाची लागण झाली. तब्बल एक दिवस घरातील लोक तसेच सामाजिक कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये बेड मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी सोमवारी दुपारी त्यांनी घरातच शेवटचा श्वास घेतला. आपल्याला कुठे तरी अ‍ॅडमिट करा अशी विनवणी करणाऱ्या मावशीसाठी आपण काही करू शकलो नाही, हतबलतेतून कार्यकर्त्यांनी सॉरी सरोदे मावशी असा संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर टाकला. त्यातून या ज्येष्ठ महिलेला शेवटच्या क्षणी झालेल्या यातना वाचून जनवाडी परिसर हेलावून गेला.

शकुंतला बबन सरोदे (वय ७७, रा. हनुमान मंदिराशेजारी, जनवाडी) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचे चिरंजीव संजय सरोदे यांनी सांगितले की मी माझा भाऊ व आमच्या दोघांच्या पत्नी, मुले एकत्र राहतो. आई घरीच असायची. सकाळी फक्त व्यायामासाठी फिरायला जात असे. दोन दिवसांपासून त्यांना ताप येत होता. डॉक्टरांनी त्यांची कोरोना चाचणी करायला सांगितली. त्यानुसार रविवारी त्यांची चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने महापालिकेच्या संपर्क क्रमांकावर बेडसाठी प्रयत्न केले. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातही काहींनी जाऊन कोठे बेड उपलब्ध आहे का याची चौकशी केली. मात्र, कोठेही बेड मिळू शकला नाही. सोमवारी सकाळपासून त्यांची तब्येत खालावत गेली. शेवटी दुपारी त्यांची प्राणज्योत मालविली.

याबाबत उमेश वाघ यांनी सांगितले की, सरोदे मावशी यांना बेड मिळावा, यासाठी या भागातील अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. परंतु, आम्हाला अपयश आले. त्यांच्या यातना आणि कुटुंबियांची हतबल झालेली परिस्थिती आम्ही थांबवू शकलो नाही.

गेल्या काही दिवसांत गोखलेनगर, जनवाडी परिसरात ७५ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्याचे आमच्या हाती राहिले.