शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून आता बारामतीत तुम्हीच लक्ष घाला! मनसेचं थेट राज्यपालांना साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 21:39 IST

बारामती शहरातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे.

बारामती: बारामती शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती भीषण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याने आरोग्य विषयक आणीबाणी निर्माण होवु पाहत आहे. बारामती शहरात रेमडेसिविर इंजेक्शनची भासणारी कमतरता ,रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागणारी धावपळ या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.सुधीर पाटसकर यांनी करताना दस्तुरखुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच बारामतीत लक्ष घालावे,अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

राज्यपालांना याबाबत अ‍ॅड. पाटसकर यांनी पत्र लिहित साकडे घातले आहे. या पत्रात त्यांनी स्थानिक प्रशासनावर टीकास्त्र सोडले आहे. येथील स्थानिक प्रशासन राजकीय दबावाखाली नियमबाह्य थेट रुग्णांना इंजेक्शन देत नाही.तर स्थानिक सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली जात आहेत. ते कार्यकर्ते त्यांच्या ओळखीच्या लोकांना ही इंजेक्शन देत आहेत. प्रशासन एका पक्षाच्या हातातील बाहुले बनले आहे,असे वाटण्यास वाव असल्याचे पाटसकर यांनी यामध्ये नमुद केले आहे.

बारामती येथील स्थानिक प्रशासन निर्णय घेताना कधीच विरोधी पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नाही. एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सर्व बैठकांना बोलविले जाते. अधिकाऱ्यांचा अंकुश नसल्याने औषध व्यावसायिक मनमानी करत आहेत.

रेमडेसिविरच्या बाबतीत सखोल ऑडिट होण्याची गरज आहे. या वितरणाची जबाबदारी प्रशासनाची आहे,मात्र ते दबावाखाली काम करत आहेत. बारामतीचे उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,औषध निरीक्षक हे प्रशासकीय अधिकारी भेदभाव करत आहे.ते त्यांची जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडत नाहीत.त्यांची चौकशी करून कारवाई व्हावी,अशी मागणी पाटसकर यांनी केली आहे.———————————————

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMNSमनसे