शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

क्षेपणास्त्र व अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

By admin | Updated: May 9, 2017 04:10 IST

फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये येत्या ११ ते १४ मे २०१७ दरम्यान पाचवे भारतीय विज्ञान संमेलन आणि एक्स्पो भरणार आहे. या संमेलनामध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये येत्या ११ ते १४ मे २०१७ दरम्यान पाचवे भारतीय विज्ञान संमेलन आणि एक्स्पो भरणार आहे. या संमेलनामध्ये देशाच्या वैज्ञानिक आणि संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक असणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र, डीआरडीओने विकसित केलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जवळून पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. त्याचबरोबर मेक इन इंडिया अभियानांतर्गत विकसित केलेली हॉवित्झर श्रेणीतील ह्यभारत ५२ह्ण ही अत्याधुनिक तोफ पुणेकरांना प्रथमच प्रत्यक्ष पाहता येणार आहे. विज्ञान भारती, महाराष्ट्र शासन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या भारतीय विज्ञान संमेलन आणि एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ व विज्ञानभारतीचे अध्यक्ष विजय भटकर, आरएनडीएसचे संचालक व्यंकटेश परळीकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे, राष्ट्रीय संघटनमंत्री जयंत सहस्त्रबुध्दे, शेखर मांडे, सहकार्यवाह मुकुंद देशपांडे यांनी याची पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. सायन्स एक्स्पो ११ ते १४ मे दरम्यान सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे. भारतीय विज्ञान संमेलनात सहभागी होण्यासाठी मात्र नोंदणी आवश्यक आहे. सायन्स एक्स्पोचे उदघाटन ११ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, भारतीय विज्ञान संमेलनाचे उदघाटन १२ तारखेला सकाळी दहा वाजता होईल. संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.