शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनाला गैरहजरप्रकरणी कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST

शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख युवराज जेधे व शहरप्रमुख नितीन सोनावले यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि ...

शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख युवराज जेधे व शहरप्रमुख नितीन सोनावले यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी वृषाली आनंद साबणे व अंगणवाडी

पर्यवेक्षिका विदया गजानन सोनवणे, संगीता राजेंद्र जाधवर, प्रतिभा हृषीकेश बरबरे, प्रज्ञा सुनील भागवत, राजश्री स्वामी भागवत या ६ जणी २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाला हजर नव्हत्या. त्यांच्या कार्यालयाच्या हजेरी पत्रकावर त्यांच्या सह्या नसुन त्यांनी इतर कोणत्याही ठिकाणी झेंडावंदन करायला हजर नव्हत्या. तालुक्यातील लहान मुलांचे भवितव्य घडवणा-या अंगणवाडी पर्यवेक्षिका आणी प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी प्रजासत्ताक दिनाला हजर राहून तिरंग्याचा मान राखण्याऐवजी कोणतीही परवानगी न घेता फिरायला गेल्यात याची चौकशी करून संकरण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना देण्यात आल्या आहेत. भोर पंचायत समितीच्या वतीने कारणे दाखवा नोटीस दिली असुन यावर त्यांनी दिलेला खुलासा व सर्व कागदपत्रे पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याचे भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.

वादग्रस्त प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी तरीही पून्हा नेमणुक का?

भोर पंचायत समितीत मार्च २०१९ पासुन कायमस्वरूपी बालविकास प्रकल्प अधिकारी नाही. त्यामुळे वर्ग २ श्रेणी असलेले सहायक गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे प्रभारी म्हणून काम पाहात होते. मात्र ते आजारी पडल्याने अंगणवाडी पर्यवेक्षिका असलेल्या वृषाली साबणे यांच्याकडे मागील तीन-चार महिन्यांपासुन प्रभार उपमुख्यकार्यकारी अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद यांनी दिला.सध्या अंगणवाडी बंद आहेत. त्यामुळे कोणताही भार नाही. मात्र प्रभारी बालविकास प्रकल्प नेमताना वर्ग २ असलेले सहायक गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी किंवा वेल्हे तालुक्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांची तात्पुरती नेमणूक न करता सुपरवायझर असलेल्या साबणेंचीच नेमणूक का? केली? यापूर्वी प्रभारी म्हणून काम करताना वृषाली साबणे यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली होती. तरीही नियमात नसतानाही पुन्हा त्यांनाच पदभार का? दिला?,यात काय गौडबंगाल आहे. याची चौकशीची मागणी होत आहे.

एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय फोटो