शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
6
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
7
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
8
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
9
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
10
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
11
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
12
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
13
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
14
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
15
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
16
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
17
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
18
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
19
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पुणे-सातारा बसमध्ये तरुणीसमोर अश्लील चाळे; आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 23:00 IST

विकृत तरुणास राजगड पोलिसांनी अथक प्रयत्नाने आज ताब्यात घेतले.

वैभव भुतकर, लोकमत न्यूज नेटवर्क, नसरापूर : दोन दिवसांपूर्वी सातारा ते पुणे बसमध्ये प्रवाशाने सहप्रवासी तरुणीसमोर स्वतःशीच उघडपणे अश्लील चाळे करून लज्जा उत्पन्न केल्याचा प्रकार घडला. सदर विकृत तरुणास राजगड पोलिसांनी अथक प्रयत्नाने आज ताब्यात घेतले.

याप्रकरणी राजगड पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून कमलेश प्रल्हाद शिरसाठ वय ४१ वर्षे सध्या रा.आंबेगाव खुर्द, पुणे मूळ रा. पी.एम.सी. बँकेसमोर, बदलापूर ईस्ट, जि.ठाणे यास ताब्यात घेतले आहे.  ५ मार्च रोजी सातारा ते पुणे या बसमध्ये शिरवळ बस थांब्यावर एक अनोळखी पुरुष बसमध्ये चढून, फिर्यादी तरुणी बसमध्ये बसलेल्या सीटच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सीटवर बसला आणि फिर्यादीकडे बघून त्याने स्वतःशीच उघडपणे अश्लील चाळे करून लज्जा उत्पन्न करण्याचा विकृत प्रकार केला. त्या तरुणास राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदरच्या संवेदनशील गुन्ह्यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी राजगड पोलिसांना दिल्याने राजगड पोलीस निरीक्षक राजेश यांनी तपास पथक तयार करून या गुन्ह्यातील आरोपीस तातडीने पकडण्याबाबत सक्त सूचना केल्या. त्यानंतर तपास पथकाने सातारा ते पुणे हायवेवरील सुमारे ७० ते ८० सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक करून दिवस-रात्र कौशल्यपूर्ण तपास करून अनोळखी आरोपीचा मागोवा घेत आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पो. कॉ अक्षय नलावडे, मंगेश कुंभार, विकास साळुंखे यांनी ही कामगिरी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस