शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

भाजपवासी हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय महत्वकांक्षेला शिवसेनेचा अडसर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 5:27 PM

विधानसभा लढविण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी शिवधनुष्य हाती घ्यावे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आव्हान..

ठळक मुद्दे इंदापुरच्या जागेचा तोडगा काढताना दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची होणार दमछाक

- प्रशांत ननवरे- बारामती: इंदापुर विधानसभा मतदारसंघातील मातब्बर नेते माजी हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि .११ ) भाजपमध्ये प्रवेश केला. इंदापुरची जागा काँग्रेसला मिळणार नसल्याने राजकीय धुर्तपणा दाखवत भाजपची वाट धरली. मात्र, पाटील यांच्या राजकीय महत्वकांक्षेला शिवसेना मोठा अडसर ठरणार असल्याचे संकेत आहेत. शिवसेना पदाधिकाºयांनी इंदापुर हा शिवसेनेचा पारंपारीक मतदारसंघ आहे.पाटील यांना निवडणुक लढविण्याची इच्छा असल्यास त्यांनी शिवधनुष्य हाती घेण्याचे आव्हान दिले आहे.तसेच शिवसेनेने घेतलेल्या मुलाखतीमध्ये  इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय महत्वकांक्षेतुन पाटील यांनी निवडलेली भाजपची वाट निसरडी होण्याची शक्यता आहे.

 इंदापुरच्या जागेवरुन सेना—भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची संकेत आहेत. शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र काळे यांनी ' लोकमत ' शी बोलताना सांगितले,इंदापुर मतदार संघ हा परंपरागत शिवसेनेचा मतदार संघ आहे .या मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक दिग्गज आपल्या संपर्कात असल्याचा दावा अ‍ॅड. काळे यांनी केला आहे. हर्षवर्धन पाटील यांना येथून निवडणूक लढवायची असल्यास त्यांनी शिवधनुष्य उचलून शिवेसेनेत प्रवेश करावा. इंदापुरची शिवसेनेची जागा पारंपारिक आहे. ती यंदा देखील राखण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना घेऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे काळे यांनी सांगितले. काळे यांच्या आव्हानामुळे  पाटील यांच्या उमेदवारीवरुन भाजप सेनेच्या पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात शड्डु ठोकण्याचे संकेत आहेत.   महायुतीची जागावाटपाची चर्चा राज्य पातळीवर यशस्वी झाल्यास इंदापुरच्या जागेचा तोडगा काढताना दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची दमछाक होणार आहे. दरम्यान,भाजप सेना युतीचे विधान सभेच्या जागेचा अद्याप ना सुटल्याने काल मुंबई येथे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघाचे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.२०१९ मध्ये इंदापूर तालुक्यात सातजण इच्छुक आहेत.यामध्ये उपजिल्हाप्रमुख संजय काळे, तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे, बिपीन कदम, विजय शिरसाट, पिंटू गुप्ते आदी इच्छुक आहेत. यामध्ये बाळासाहेब शिंदे व नितीन कदम यांनी मंगळवारी(दि १०) मुंबई मध्ये मुलाखत दिली. बाकी सर्वजण वेळेत पोहोचूनशकल्याने उर्वरित इच्छुकांच्या नंतर मुलाखती घेण्यात येतील असे सांगण्यात आले. इंदापूर हा मतदारसंघ १९९५ पासून शिवसेनेकडे आहे २०१४ ला शिवसेना व भाजप  विभक्त लढल्याने दोन्ही पक्ष्याचे उमेदवार उभे होते. यामुळे इंद्पुर तालुका शिवसेनेच्या वतीने इंदापूरची जागा शिवसेनेकडे ठेवावी, अशी मागणी पक्ष प्रमुखाकडे केली आहे, अशी प्रतिक्रिया उपजिल्हा प्रमुख संजय काळे यांनी  लोकमत  शी बोलताना दिली. इंदापूर विधानसभा मतदार संघ १९९५ पासून शिवसेनेकडे आहे . २०१४ चा अपवाद वगळता इंदापूरची जागा शिवसेनेने लढवलेली आहे. १९९५ व १९९९ ला हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. २००४ मध्ये शिवसेनेकडून पारादीप गारटकर यांनी निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना ७० ते ७२ हजारांच्या आसपास मते मिळाली होती.२००९ मध्ये शिवसेनेकडून भीमराव भोसले यांनी निवडणूक लढविली होती, २०१४ मध्ये विशाल बोन्द्रे यांनी निवडणूक लढविली होती. २०१९ मध्ये इंदापूर तालुक्यात सातजण इच्छुक आहेत यामध्ये उपजिल्हाप्रमुख संजय काळे, तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे, बिपीन कदम, विजय शिरसाट, पिंटू गुप्ते आदी इच्छुक आहेत, यामध्ये बाळासाहेब शिंदे व नितीन कदम यांनी काल मुंबई मध्ये मुलाखत दिली बाकी सर्वजण वेळेत पोहचू न शकल्याने उर्वरित इच्छुकांच्या नंतर मुलाखती घेण्यात येतील असे सांगण्यात आले. इंदापूर हा मतदारसंघ १९९५ पासून शिवसेनेकडे आहे २०१४ ला शिवसेना व भाजप विभक्त लढल्याने दोन्ही पक्ष्याचे उमेदवार उभे होते .दत्तात्रय भरणे यांना (८४, ७६९) मतदान मिळाले.  या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे भीमराव भोसले यांना ४००० मते मिळाली होती.मात्र, २०१४ सालच्या निवडणुकीत काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्ये चुरशीची लढत होऊन, राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी ( १ लाख, ८ हजार४००) मते मिळवित  तब्बल १५ हजार मताधिक्याने हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत पाटील यांना (९४ हजार २२७) मतदान मिळाले. या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे विशाल बोंद्रे  यांना २१७८  मते मिळालीहोती.२०१९ साठी देखील इंदापुरची जागा लढविण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे.——————

टॅग्स :BaramatiबारामतीIndapurइंदापूरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकMLAआमदारNCPराष्ट्रवादी काँग्रेस