Join us  

SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हा सामना होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 5:01 PM

Open in App

IPL 2024, SRH vs LSG Live : हैदराबादमध्ये काल धो धो पाऊस पडला आणि अख्ख स्टेडियम भिजलं होतं... आजही ढगाळ वातावरण आहे आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हा सामना होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांचा तसा फायदाच आहे. दोन्ही संघ ११ सामन्यांत ६ विजय मिळवून १२ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहेत. SRH चौथ्या ( -०.०६५) आणि LSG सहाव्या ( -०.३७१) क्रमांकावर आहेत. आजचा सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण दिला जाईल आणि ते अव्वल चारमध्ये पोहोचतील आणि चेन्नई सुपर किंग्स पाचव्या क्रमांकावर फेकला जाईल, जो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

हा सामना होणे मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचे...आयपीएल २०२४ शेवटच्या टप्प्यात नेहमीच रंगतदार झाली आहे. राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स हे प्रत्येकी १६ गुण मिळवूनही अद्याप प्ले ऑफसाठी पात्र ठरलेले नाहीत. चेन्नई, हैदराबाद, दिल्ली व लखनौ हे पत्येकी १२ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत, तर बंगळुरू, गुजरात, पंजाब व मुंबई हे प्रत्येकी ८ गुण असलेल्या संघांच्या आशा अजूनही कायम आहेत. पण, जर आज पावसामुळे सामना झालाच नाही तर...

हवामान खात्याच्या अंदाजानुसार हैदराबादमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ६०-६५ टक्के आहे. त्यामुळे सायंकाळी सामन्याच्या वेळी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. हा सामना रद्द झाल्यास हैदराबाद व लखनौ यांना प्रत्येकी १ गुण मिळतील. पण, हा सामना न झाल्यास मुंबई इंडियन्स अधिकृतपणे प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकले जातील, तर पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातल्या सामन्यातील पराभूत होणारा संघही बाद होईल.

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादलखनौ सुपर जायंट्समुंबई इंडियन्स