शहरं
Join us  
Trending Stories
1
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
2
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
3
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
4
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
5
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
6
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
7
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
8
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे
9
"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान
10
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
11
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
12
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
13
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
14
मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!
15
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
16
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
17
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
19
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
20
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 3:10 PM

Vijay Wadettiwar : काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन होतील, असा दावा शरद पवार यांनी  इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत केला होता.

Vijay Wadettiwar on Sharad Pawar  नागपूर : लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांनी आगामी काळात प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. यावर यावर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल, त्यामुळे शरद पवारांना असे वाटणे स्वाभाविक आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन होतील, असा दावा शरद पवार यांनी  इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना विचारले असता, ते म्हणाले की, शरद पवार मोठे नेते आहेत, हायकमांडकडे काय चर्चा होते, त्या संदर्भात मला माहीत नाही. शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचे आहेत. गांधी विचार कोणी संपवू शकत नाही. काही पक्ष हे अवकाळी पावसासारखे आहेत. अवकाळी पाऊस जनमाणसाला उद्धवस्थ करून जातो, तशी आताच्या सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे. परंतु काँग्रेस हा निरंतर वाहणाऱ्या नदीसारखा पक्ष आहे. ज्या विचारांनी हा पक्ष उभा झालेला आहे.

राजीव गांधी ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत विकास हा अजेंडा राहिलेला आहे. आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. जनता पूर्ण देश बदलण्याची तयारी करून बसलेली आहे. काँग्रेसच्या मागे जनता उभी असल्याचे दिसून येत आहे. पवार साहेबांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्यांना फार दूरच अभ्यास असतो. त्यांना दूरदृष्टी आहे. शरद पवारांचा जन्मच काँग्रेस आहे, गांधी विचारधार आहे. ते तालमीतच तयार झाले आहेतृ. यशवंतराव चव्हाण पासून त्यांच्या कारकीर्दी सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल, असे वाटणे स्वाभाविक आहे,असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, शरद पवार यांच्या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नुकतेच पुण्याला राहुल गांधी आले होते. त्यावेळी राहुल गांधींनी मला सांगितले की, राज्यात सर्वत्र प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये समाविष्ट होतील ही चर्चा आहे. भाजपाच्या तानाशाहीचा विरोधात अनेक पक्ष एकत्र येणार आहेत. अनेक पक्षांनी भाजपाच्याविरोधात त्यांच्या तानाशाहीच्या विरोधात मोट बांधावी, असे राहुल गांधी यांना सांगितले. त्यामुळे शरद पवार यांच्या वक्तव्यात तथ्य आहे. गांधी परिवारच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे अटी शर्ती काही नाही. कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत राहुल गांधींनी काढलेल्या पदयात्रा नागरिकांचा विश्वास वाढला आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारSharad Pawarशरद पवारmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४