Join us  

भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 6:01 PM

विविध देशांमध्ये सुमारे 2 कोटी भारतीय राहतात, जे दरवर्षी आपल्या कुटुंबांना अब्जावधी डॉलर्स पाठवतात.

India Remittance: जगभरात करोडो लोक आहेत, जे आपला देश सोडून परदेशात नोकरी किंवा व्यवसायानिमित्त स्थायिक होतात. यातील अनेकजण परदेशात पैसे कमावून आपल्या मायदेशात कुटुंबीयांना पाठवतात. या लोकांमध्ये भारत अव्वल स्थानावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मायग्रेशन एजन्सीने आकडेवारी सादर करताना सांगितले की, 2022 मध्ये इतर देशांमधून 111 अब्ज डॉलर्स भारतात पाठवले गेले. 111 अब्ज डॉलर्सच्या रेमिटन्ससह भारत हा 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारा पहिला देश बनला आहे. विशेष म्हणजे, फक्त एका वर्षात एवढी मोठी रक्कम भारतात पाठवण्यात आली आहे. 

जगभरात सुमारे 2 कोटी अनिवासी भारतीयइंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) ने मंगळवारी (7 मे) 2024 चा जागतिक स्थलांतर अहवाल प्रसिद्ध केला, ज्यामध्ये भारत, मेक्सिको, चीन, फिलीपिन्स आणि फ्रान्स हे सर्वाधिक रेमिटन्स(परदेशातून पैसे पाठवणे) प्राप्त करणारे पाच देश आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान आणि बांगलादेशचेही टॉप 10 यादीत नाव आहे. सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणाऱ्या 10 देशांच्या यादीत चार आशियाई देश आहेत. भारताबद्दल बोलायचे झाले तर, विविध देशांमध्ये सुमारे 2 कोटी अनिवासी भारतीय राहतात, जे दरवर्षी आपल्या कुटुंबांना अब्जावधी डॉलर्स पाठवतात. 

आशियातील स्थलांतरितांची संख्या सर्वाधिकरिपोर्टनुसार, 2010 मध्ये भारतात 53.48 अब्ज डॉलर्स रेमिटन्स म्हणून आले. तर, 2015 मध्ये 68.19 आणि 2020 मध्ये 83.15 अब्ज डॉलर्स आले. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आशियामध्ये स्थलांतरित कामगारांची संख्या सर्वाधिक आहे, म्हणून ते जगभरातून पैसे पाठवण्यात आघाडीवर आहे. भारताच्या शेजारील पाकिस्तानला 30 अब्ज डॉलर्स, तर बांगलादेशला 21.5 अब्ज डॉलर्स रेमिटन्स मिळाले आहेत. 

स्थलांतरितांना मोठ्या अडचणीपरदेशात काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांनी पाठवलेला पैशामुळे मायदेशात राहणाऱ्या कुटुंबीयांना फायदा होतो, पण या असंख्य स्थलांतरित कामगारांना मोठ्या आर्थिक संकटासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. स्थलांतराच्या खर्चामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा वाढतो. कामाच्या ठिकाणी गैरवर्तन आणि नोकरीवर असताना झेनोफोबिया(परदेशी लोकांना नापसंत करणे) यासारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. 

भारतातील बहुतांश नागरिक परदेशात राहतातइतर देशांमध्ये शिकण्यासाठी आणि नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक संख्या भारतीयांची आहे. जगात सर्वाधिक स्थलांतरित भारतात आहेत. सुमारे 1 कोटी 80 लाख भारतीय परदेशात राहतात. हे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 1.3 टक्के आहे, त्यापैकी बहुतेक संयुक्त अरब अमिराती, युनायटेड स्टेट्स आणि सौदी अरेबियामध्ये राहतात.

बहुतांश स्थलांतरित आखाती देशांमध्ये जातातजगभरातील सर्वाधिक स्थलांतरित लोक आखाती देशांमध्ये जातात. गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) देशांच्या एकूण लोकसंख्येमध्ये स्थलांतरितांचा वाटा जास्त आहे. यूएईमध्ये हे प्रमाण 88 टक्के, कुवेतमध्ये 73 टक्के आणि कतारमध्ये 77 टक्के आहे. देशात येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या बाबतीत भारत 13व्या क्रमांकावर आहे. येथे 44 लाख 80 हजार परप्रांतीय राहतात.

शिक्षणासाठी अमेरिकेला पसंतीजगभरातून बहुतांश मुले अमेरिकेत शिकायला जातात. 2021 मध्ये 8 लाख 33 हजार स्थलांतरित विद्यार्थी शिक्षणासाठी गेले होते. तर, विद्यार्थी युनायटेड किंगडममध्ये 6,01,000, ऑस्ट्रेलियामध्ये 3,78,000, जर्मनीमध्ये 3,76,000 आणि कॅनडात 3,18,000 मुले शिकण्यासाठी गेले. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या लोकांमध्ये चिनी लोकांची संख्या सर्वाधिक आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये 5,08,000 भारतीय विद्यार्थी परदेशात शिकण्यासाठी गेले, तर चीनमध्ये ही संख्या दुप्पट आहे.

टॅग्स :भारतव्यवसायगुंतवणूकअमेरिकाजर्मनीआंतरराष्ट्रीय