शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 5:27 PM

Lok Sabha Election 2024 Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना इशारा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील हरदोई येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आलेले गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना इशारा दिला आहे. झारखंडमधील मंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या नोकराच्या घरातून रोख रक्कम जप्त केल्याच्या प्रकरणाचा संदर्भ देताना गृहमंत्र्यांनी हा इशारा दिला.

अमित शाह म्हणाले की, "ही घमंडीया आघाडी आहे, सपा, काँग्रेस, टीएमसी... या सर्वांनी एकत्र येऊन 12 लाख कोटी रुपयांचे घोटाळे केले आहेत. कालच झारखंडमध्ये इंडिया आघाडीच्या मंत्र्याच्या स्वीय सहायकाच्या नोकराच्या घरातून 30 कोटी रुपये जप्त करण्यात आले."

"काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदाराच्या घरातून 350 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. त्याच्या काही दिवसांआधी टीएमसीच्या एका नेत्याच्या घरातून 51 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. मला राहुलबाबा आणि अखिलेश यांना सांगायचं आहे की, तुम्ही भ्रष्टाचार केलात तर पकडले जाल आणि तुरुंगातही जाल. कोणीही थांबवू शकत नाही."

"2021 मध्ये अखिलेश यादव हरदोई येथे सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यासाठी आले होते आणि मोहम्मद अली जिना हे महान व्यक्ती होते असं म्हटलं होतं. अखिलेश यादव, इतिहासाचा नीट अभ्यास करा, भारतमातेचे तुकडे तुकडे करणारे दुसरे कोणी नसून तुमचे महान नेते मोहम्मद अली जिना होते."

"आत्ताच पाकिस्तानने राहुल बाबांची खूप प्रशंसा केली आहे. एका पत्रकाराने मला विचारलं की, पाकिस्तान राहुल गांधींची स्तुती का करत आहे? तर मी म्हणालो, सर्जिकल स्ट्राईक होतात, राहुल बाबा निषेध करतात. नक्षलवादी मरतात, राहुल बाबा विरोध करतात. राम मंदिर बांधलं, राहुल बाबा विरोध करतात. राहुल बाबा पाकिस्तानचा अजेंडा पुढे नेतात आणि पाकिस्तान राहुल यांचं समर्थन करतो" असं म्हणत अमित शाह यांनी टीकास्त्र सोडलं आहे.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादव