Shirur: शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू; दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:02 IST2025-07-29T18:02:26+5:302025-07-29T18:02:41+5:30
या दुर्घटनेमुळे शिरूरच्या कारेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेततळ्याजवळील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे

Shirur: शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू; दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु
कारेगाव : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील बाभूळसर गावच्या शिवेवर सोमवारी सायंकाळी शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या मुलांची नावे अनमोल उर्फ बाबू प्रवीण पवार (वय १३) आणि कृष्णा उमाजी राखे (वय ८ वर्षे, दोघेही रा. कारेगाव) अशी आहेत. या घटनेतील इतर दोन मुलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची फिर्याद प्रदीप रामराव पवार (वय ३२, रा. कारेगाव) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतील इतर दोन मुलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. पोलिस हवालदार गणेश आगलावे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या दुर्घटनेमुळे कारेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेततळ्याजवळील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे.